Sunil Gavaskar on Team India : सध्या सुरू असलेल्या T20 World Cup ला धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली. या वर्ल्ड कपमध्ये काही क्लोज एनकाऊंटर्स पहायला मिळत आहेत. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला (Pakistan) लोळवलं तर दुसऱ्या सामन्या एकहाती नेदरलँडचा (Netherlands) पराभव केलाय. त्यामुळे आता टीम इंडियाचा सेमीफायनल प्रवास आणखी सोपा झाल्याचं दिसतंय. अशातच आता भारताचे माजी स्टार खेळाडू सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाला सावधगिरीचा इशारा दिला आहे.
पाकिस्तानला उरलेले तीन सामनेही मोठ्या फरकानं जिंकावे लागतील आणि ते दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत असल्यानं ते सोपं जाणार नाही, दक्षिण आफ्रिका (South Africa) देखील एक अव्वल संघ आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धही भारताला खूप काळजी घ्यावी लागणार असल्याचं देखील सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) म्हटलं आहे.
आणखी वाचा - T20 World Cup मध्ये आता 'हा' खेळाडू ओपनिंग करणार? रोहितच्या मनात आहे तरी काय?
आता झिम्बाब्वेनं पाकिस्तानला (Pakistan) पराभूत केलं आहे, त्यामुळे भारताला झिम्बाब्वेविरुद्धही सावधगिरी बाळगावी लागेल. पाकिस्तानविरुद्धच्या विजयाने झिम्बाब्वे उत्साहात असेल. त्यामुळे पुढील सामन्यात ते आणखी ताकद लावतील, त्यामुळे टीम इंडियाने सावधान व्हावं, असा सल्ला देखील सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी दिलाय.
दरम्यान, 30 ऑक्टोबर रोजी भारताचा सामना तगड्या दक्षिण अफ्रिकेसोबत (India VS South Africa) होणार आहे. हा सामना जिंकताच टीम इंडिया सेमिफायनलचे दरावाजे खटखटणार आहे. तर त्यानंतर 2 नोव्हेंबरला भारत बांग्लादेशशी (IND vs BAN) दोन हात करणार आहे. त्यानंतर पाकिस्तानला हरवलेल्या झिम्बॉब्वेसोबत (IND vs ZIM) भारताचा सामना असणार आहे. त्यानंतर सेमीफायनलच्या लढती चालू होतील.