नाद करा पण सूर्याचा कुठं! धोनीच्या समोरच त्याचाच विक्रम मोडत रचला इतिहास

सूर्यकुमारने या सामन्यात 47 धावा करत महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांचा रेकॉर्ड मोडला आहे.

Updated: Jan 28, 2023, 12:12 AM IST
नाद करा पण सूर्याचा कुठं! धोनीच्या समोरच त्याचाच विक्रम मोडत रचला इतिहास

IND vs NZ : न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने मोठा इतिहास रचला आहे. माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा घरच्या मैदानावर त्याच्याच समोर एक मोठा विक्रम सूर्यकुमार यादवने त्याच्या नावावर केला आहे. सूर्याने टी- 20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली  आहे. 

सूर्यकुमारने या सामन्यात 47 धावा करत महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांचा रेकॉर्ड मोडला आहे. सूर्याने अवघ्या 46 सामन्यांमध्ये हा कामगिरी केली आहे. महेंद्रसिंह धोनीने 98 सामन्यांच्या 85 डावांमध्ये 1617 धावा केल्या आहेत. तर रैनाच्या 78 सामन्यांच्या 66 डावांमध्ये 1605 धावा आहेत. सूर्य कुमारने अवघ्या 43 डावांमध्ये 1500 धावांचा टप्पा पार केला होता. 

न्यूझीलंडने भारताच्या आघाडीच्या फलंदांजाना बाद करत संघाला जबर धक्के दिले होते. सूर्या मैदानात आल्यावर त्याने दमदार फटकेबाजी केली. काहीवेळ सामना भारत सहज जिंकणार असं वाटत होतं, कारण मैदानावर सूर्या आणि हार्दिक मैदानावर होते. मात्र सूर्या 47 धावांवर असताना बाद झाला आणि सामना न्यूझीलंडच्या पारड्यात झुकला.

दरम्यान, भारताला न्यूझीलंड संघाने दिलेल्या 177 धावांचा पाठलाग करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 9 गडी गमावत 155 धावा करत आल्या. युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने शेवटला येत आशा जिवंत केल्या होत्या. मात्र दुसऱ्या बाजून कोणीही नसल्याने त्याचेही प्रयत्न अपुरे पडले. सुंदरने 50 धावांची जिगरबाज खेळी केली. तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये किवींनी 1-0 ने आघाडी घेतली आहे.