मुंबई : हाँगकाँगविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहली आणि सूर्यकुमार यांनी त्यांच्या फलंदाजीचा क्लास दाखवला. चौथ्या सामन्यात दिसला, जेव्हा विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी हाँगकाँगच्या गोलंदाजांचा कहर केला. भारताने हा सामना जिंकत सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. दरम्यान या सामन्यात सुर्यकुमार यादवच्या झुंजार खेळीसमोर विराट कोहली देखील नतमस्तक झाला.
या सामन्यामध्ये सुर्यकुमार यादवने 26 बॉल्समध्ये नाबाद 68 रन्सची तुफानी खेळी खेळली. हे पाहिल्यानंतर कोहलीही त्याचा आदर केल्याशिवाय राहू शकला नाही. भारताचा डाव संपल्यानंतर विराटने सूर्यकुमारला खास वाकून नमस्कार केला, ज्यावर सूर्यकुमारची प्रतिक्रिया समोर आली आहे.
“ते एक मनाला भिडणारं जेस्टर होतं. मी हे आधी कधीच पाहिलं नव्हतें. मी त्याच्याकडे बघत होतो आणि विचार करत होतो की, तो पुढे का चालत नाहीये? मग मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला सोबत येण्यास सांगितलं, तो खूप अनुभवी खेळाडू आहे. मला त्याच्यासोबत फलंदाजी करायला मजा येते,” असं सुर्यकुमार यादवने म्हटलंय.
आशिया कपमध्ये टीम इंडियाचे खेळाडू चांगल्या लयीमध्ये दिसत आहेत. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी हाँगकाँगविरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली.
तो पुढे म्हणाला, “परिस्थिती अशी होती की मला वेगाने रन्स करावे लागले. कारण सुरुवातीला विकेट थोडी स्लो होती. मी विराटशी बोललो आणि त्याने मला फक्त माझा नॅचरल खेळ खेळायला सांगितलं. माझ्याही फलंदाजीबाबत अतिशय स्पष्ट योजना होत्या, त्यामुळे त्याच्यासोबत फलंदाजी करण्यात अधिक मजा आली."