मुंबई : टीम इंडियाने (Team India) आशिया कपच्या सुपर 4 मध्ये धडक मारलीय. मात्र क्रिकेट चाहत्यांच लक्ष हे टी 20 वर्ल्ड कपवर लागून राहिलंय. ऑस्ट्रेलियाला या टी 20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2022) यजमानपद देण्यात आलंय. ऑस्ट्रेलियाने या वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केलाय. तर टीम इंडियाचा संघ हा पुढील 15 दिवसात जाहीर होणं अपेक्षित आहे. त्यामुळे टीम इंडियात कोणत्या खेळाडूला वर्ल्ड कपसाठी संधी मिळणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागून राहिलंय. (t20i world cup team india announce soon who will get chance in squad)
सर्व संघांना 15 सप्टेंबरपर्यंत वर्ल्ड कपसाठी आपल्या खेळाडूंची नावं द्यायची आहेत, असं आवाहन आयसीसीने याआधीच केलंय. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडिया आता टी 20 वर्ल्ड कपनुसार जोरदार तयारीला लागलीय.
वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जवळपास निश्चित मानला जात आहे. तर 2-3 खेळाडूंबाबत चर्चा होऊ शकते.
रोहित शर्मा (कर्णधार)
केएल राहुल (उप-कर्णधार)
विराट कोहली
सूर्यकुमार यादव
ऋषभ पंत
दिनेश कार्तिक
हार्दिक पंड्या
रवींद्र जडेजा
भुवनेश्वर कुमार
जसप्रीत बुमराह
हर्षल पटेल
युजवेंद्र चहल
रविचंद्रन अश्विन
अर्शदीप सिंह
दीपक हुड्डा
T20 वर्ल्ड कपला 16 ऑक्टोबरपासून सुरूवात होतेय. तर फायनल 13 नोव्हेंबरला होणार आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलियातील 7 वेगवेगळ्या शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. टीम इंडियाचं ग्रुप 2 मध्ये समावेश करण्यात आलंय. याशिवाय पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकाही या ग्रुपमध्ये आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर, मेलबर्न
भारत विरुद्ध ग्रुप ए रनर-अप, 27 अक्टूबर, सिडनी
भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका, 30 ऑक्टोबर, पर्थ
भारत विरुद्ध बांग्लादेश, 2 नोव्हेंबर, एडिलेड
भारत विरुद्ध ग्रुप बी विनर, नोव्हेंबर, मेलबर्न