Suryakumar Yadav Viral Video: भारत विरूद्ध श्रीलंका (Ind Vs SL 3RD ODI) या वनडे सिरीजमध्ये लंकेला क्लिन स्विप देऊन एतिहास रचला. तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने 317 रन्सने विजय मिळवत इतिहास रचला. दरम्यान यावेळी दुखापतीच्या कारणामुळे संजू सॅमसनला (Sanju Samson) सिरीजच्या मधूनच माघारी परतावं लागलं. संजूच्या चाहत्यांनी होमटाऊनमध्ये त्याला फार मिस केलं. मात्र टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) संजूच्या चाहत्यांचं मन जिंकलं आहे. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
15 जानेवारी रोजी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये तिसरा वनडे सामना रंगला होता. या सामन्यात सूर्यकुमार फिल्डींग करत होता. याचवेळी एक चाहते संजू-संजू म्हणून ओरडू लागले. सूर्यकुमारच्या ज्यावेळी ही गोष्ट लक्षात आली, तेव्हा त्याने चाहत्यांना इशारा करून विचारलं की, काय झालं? सूर्याच्या या प्रश्नावर चाहत्यांनी विचारलं की, आमचा सूर्या कुठे आहे. हा प्रश्न विचारताच सूर्याने स्वतःच्या हृदयाकडे इशारा केला आणि त्याचं हे उत्तर चाहत्यांना चांगलच भावलं.
Surya kumar Yadav winning #SanjuSamson Fans hearts #sky #INDvSL #BCCI #CricketTwitter pic.twitter.com/uGsJR14Zv6
— Rohit (@___Invisible_1) January 16, 2023
सोशल मिडीयावर सूर्याच्या चाहत्यांना त्याचं हे रिएक्शन खूप आवताना दिसतंय. यापूर्वीही एकदा तिरुअनंतपुरममध्ये चाहत्यांनी संजू-संजू अशी नारेबाजी केली होती. त्यावेळी सूर्याने त्या चाहत्यांना स्वतःच्या फोनमध्ये त्याला फोटो दाखवला होता. केरळमध्ये संजूचे बरेच चाहते आहेत. चाहते त्याला त्यांचा लोकल हिरो मानतात.
भारत विरूद्ध श्रीलंका यांच्याविरूद्धच्या 3 वनडे सामन्यात सॅमनसनची निवड करण्यात आली होती. मात्र सामना सुरु होण्यापूर्वी त्याला दुखापत झाली. ज्यामुळे त्याला बीसीसीआयकडून एक निवेदन जाहीर करण्यात आलं. यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की, संजू सॅमसन दुखापतीच्या कारणामुळे सिरीजमधील सामने खेळणार नाही. त्याला उपचार आणि रिहॅबची गरज आहे.
यानंतर न्यूझीलंडविरूद्धच्या सिरीजमध्ये संजू सॅमसनची निवड करण्यात आली नाही. सोशल मीडियावर अनेकदा संजूला टीममध्ये घेण्याच्या बाबतीत टाळाटाळ होत असल्याचा आरोप लावला जातो.
तिसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या बॅटींग ऑर्डरला खिंडार पाडलं. सिराजने कुसल मेंडिस 4, अविष्का फर्नांडो 1, नुवानिदू फर्नांडो 19, आणि वानिंदू हसरंगा 1 यांना बाद केलं. नुवानिदू फर्नांडो वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. फर्नांडो, शनाका 11, कसून राजिथा नाबाद 13 हे खेळाडू दुसऱ्या एकाही फलंदाजाने दुहेरी धावसंख्या केली नाही.
मोहम्मद सिराजने 5 विकेट पूर्ण करण्यासाठी 1 विकेट घ्यायला आपली पूर्ण ताकद पणाला लावली. मात्र त्याला यश आलं नाही. सिराजसह कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. श्रीलंकेला विराटला दिलेलं जीवदान महागात पडलं. विराट कोहलीने शतक केल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला, सिक्स आणि चौकार मारत संघाला 400 च्या जवळपास आणून ठेवलं.