पर्थ : टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादवने (Surykumar Yadav) झिम्बाब्वे (Zimbabwe) विरुद्ध 35 धावा करून इतिहास रचला आहे. या धावांसह T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 धावा करणारा सूर्यकुमार भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी एका वर्षात भारतासाठी असा पराक्रम इतर कोणत्याही फलंदाजाने केला नव्हता.
हे ही वाचा : भीम पराक्रमानंतर सुर्यकुमार यादवला खुणावतोय 'विराट' विक्रम, जाणून घ्या
सूर्यकुमार यादव (Surykumar Yadav) याने झिम्बाब्वे (Zimbabwe) विरुद्ध संघाच्या शेवटच्या गट सामन्यात 35 धावा पूर्ण केल्यामुळे क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये इतिहास रचला.सूर्यकुमार यादव आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 धावा करणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे.
सूर्यकुमार यादव (Surykumar Yadav) एका वर्षात 1000 धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी 2021 साली पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज मोहम्मद रिझवानने अशी कामगिरी केली होती. एवढेच नाही तर 2022 मध्ये तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज बनला.
सूर्यकुमार यादवने (Surykumar Yadav) झिम्बाब्वेविरुद्ध शानदार खेळी खेळली आहे. त्याने अवघ्या 23 बॉंलमध्ये अर्धशतक पूर्ण केले आहे. या खेळीत त्याने 3 सिक्स आणि 5 फोर मारले आहेत. या सामन्यात सूर्यकुमार यादवने 25 बॉलमध्ये नाबाद 61 धावांची खेळी केली आहे.
सुर्य़कुमार यादवच्या (Surykumar Yadav) नाबाद 61 धावा आणि के एल राहूलच्या 51 धावांच्या बळावर टीम इंडियाने 5 विकेट गमावून 186 धावा ठोकल्या आहेत.त्यामुळे टीम इंडियाने (Team India) झिंम्बाब्वे समोर 187 धावांचे आव्हान ठेवलं आहे.