IND vs ZIM : भीम पराक्रमानंतर सुर्यकुमार यादवला खुणावतोय 'विराट' विक्रम, जाणून घ्या

स्काय इज हाय,पण सुर्यासमोर नाही..., आता टी20 वर्ल्ड कपमध्ये मोठा रेकॉर्ड करण्याची संधी

Updated: Nov 6, 2022, 05:31 PM IST
IND vs ZIM : भीम पराक्रमानंतर सुर्यकुमार यादवला खुणावतोय 'विराट' विक्रम, जाणून घ्या   title=

पर्थ : टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवने (Surykumar Yadav) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सुर्यकुमार T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 धावा ठोकणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. या त्याच्या कामगिरीनंतर आता सुर्यकुमार यादवला (Surykumar Yadav) हा मोठा रेकॉर्ड खुणावतोय, हा रेकॉर्ड काय आहे तो जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : सुर्यकुमार यादवचा भीम पराक्रम! झिम्बाब्वेविरूद्ध केला मोठा विक्रम

सूर्यकुमार यादवने (Surykumar Yadav)  झिम्बाब्वे (Zimbabwe)  विरुद्ध 35 धावा करून इतिहास रचला आहे. या धावांसह T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 धावा करणारा सूर्यकुमार भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी एका वर्षात भारतासाठी असा पराक्रम इतर कोणत्याही फलंदाजाने केला नव्हता.

'हा' रेकॉर्ड करण्याची संधी 

सुर्यकुमार यादवच्या (Surykumar Yadav) या भीमपराक्रमानंतर आता त्याला आणखीण एक रेकॉर्ड खुणावतो आहे. सुर्यकुमार यादवला या टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वांधिक धावा करून रेकॉर्ड करण्याची संधी आहे. सुर्यकुमार यादव सर्वांधिक धावांमध्ये सध्या तिसऱ्या स्थानी आहे. त्याने त्याच्या पुढच्या सामन्यात जर मोठी धावसंख्या केली तर तो टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वांधिक धावा करणारा खेळाडू ठरणार आहे. 

विराटचा व्रिक्रम मो़डण्याची संधी

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2022) सर्वाधिक धावा करणाऱ्या ऱॅकींगमध्ये विराट (Virat Kohli) पहिल्या क्रमांकावर आहे. विराटने 5 इनिंग्समध्ये 246 धावा ठोकल्या आहेत. तर विराटनंतर नेदरलँड्सच्या मॅक्स ओडाऊ़ड दुसऱ्या नंबरवर आहे. मॅक्सने 8 इनिंग्समध्ये 242 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर सुर्यकुमार (Surykumar Yadav) तिसऱ्या क्रमांकावर येतो. सुर्यकुमार यादवने 5 इनिंग्समध्ये 225 धावा केल्या आहेत. तो नंबर एक येण्यापासुन फक्त 21 धावा दुर आहे. पण विराटही जर खेळला तर सर्वाधिक धावा ठोकण्यात या दोघांमध्ये स्पर्धा होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान सेमी फायनल आणि फायनल पकडली तर विराट आणि सुर्यकुमार (Surykumar Yadav) यादवला दोन संधी आहेत. या सामन्यात आता सर्वांधिक धावा करण्याचा विक्रम करतो, हे फायनल सामन्यात कळणार आहे.