Cricket : सूर्यकुमार दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातून बाहेर, टेस्ट सीरिजलाही मुकणार?

 दुलीप ट्रॉफीला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे मात्र त्यापूर्वी सूर्यकुमार यादवच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. 

Updated: Sep 2, 2024, 08:50 PM IST
Cricket : सूर्यकुमार दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातून बाहेर, टेस्ट सीरिजलाही मुकणार?  title=
(Photo Credit : Social Media)

Suryakumar Yadav Missed Duleep Trophy : बीसीसीआयने टीम इंडियातील विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे दिग्गज खेळाडू वगळता इतर सर्वांना दुलीप ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यास सांगितले आहे. दुलीप ट्रॉफीला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे मात्र त्यापूर्वी सूर्यकुमार यादवच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच सूर्यकुमारला बुची बाबू स्पर्धेत खेळताना दुखापत झाली होती. या दुखापतीच्या कारणाने सूर्याने दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातून माघार घेतली आहे.   

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचा समावेश दुलीप ट्रॉफीसाठी इंडिया सी संघात करण्यात आला होता. इंडिया सीचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे. पहिल्या फेरीत इंडिया सी संघाला इंडिया डी सोबत सामना खेळायचा होता. मात्र बुची बाबू स्पर्धेतील एका सामन्यात मुंबई संघाकडून खेळताना सूर्याच्या हाताला दुखापत झाली. या दुखापतीमुळे सूर्याला शेवटच्या दिवसाच्या खेळात सहभागी होता आले नव्हते. सूर्याची दुखापत किती गंभीर आहे याबाबत माहिती मिळालेली नाही परंतु त्याला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ( NCA ) मध्ये उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. 

दुखापतीमुळे सूर्या टेस्ट सीरिजला मुकणार? 

सप्टेंबर 19 पासून भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात येणार आहे . तर यानंतर 6 आणि 9 ऑक्टोबर रोजी टी 20 सिरीज सुद्धा खेळवली जाईल. या सीरिजसाठी बांगलादेश क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. बांगलादेश विरुद्ध सीरिजसाठी अजून निवड समितीने भारतीय संघ जाहीर केलेला नाही. सूर्यकुमार यादवच्या या दुखापतीमुळे तो भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सिरीजला मुकण्याची शक्यता आहे. ही टेस्ट सिरीज 2025 मधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी महत्वाची असणार आहे. यापूर्वी सूर्या टीम इंडियाकडून टेस्ट सामन्यात त्याच्या फलंदाजीची कमाल दाखवू शकला नव्हता. 

सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे दुलीप ट्रॉफीतील इंडिया सी संघाला पहिल्या सामन्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या संघाचे कर्णधारपद मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाडकडे आहे. सूर्याच्या अनुपस्थितीत आता इंडिया सी च्या पहिल्या सामन्यात कोणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी चार संघ : 

टीम अ: शुभमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसीध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा, कुमार कुशाग्रा , शास्वत रावत.

टीम ब: अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी*, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी , एन जगदीसन. 

टीम क: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल, सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीथ, हृतिक शोकीन, मानव सुथार, उमरान मलिक, विशाल विजयकुमार, अंशुल खांबोज, हिमांशू चौहान, मयंक जुयाल, मयंक मार्कनडे, संदीप वारियर.

टीम ड : श्रेयस लियर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन, रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत, सौरभ कुमार.