जे रोहित शर्मालाही नाही जमलं, ते एका महिला क्रिकेटरने करून दाखवलं!

पुरुष आणि महिला गटात अशी कामगिरी करणारी ती पहिली खेळाडू ठरलीये

Updated: Aug 4, 2022, 10:27 AM IST
जे रोहित शर्मालाही नाही जमलं, ते एका महिला क्रिकेटरने करून दाखवलं! title=

मुंबई : न्यूझीलंडची महिला क्रिकेटर सुझी बेट्सने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचलाय. तिने 3500 रन्स पूर्ण केले आहेत. पुरुष आणि महिला गटात अशी कामगिरी करणारी ती पहिली खेळाडू ठरलीये. कॉमनवेल्थ गेम्स (CWG 2022) च्या एका सामन्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी केली. 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये हा विक्रम करण्याची संधी होती, मात्र तो शून्यावर बाद झाला. मंगळवारी तिसऱ्या टी-20 सामन्यात 11 रन्स केल्यानंतर दुखापतग्रस्त झाला. त्याने आतापर्यंत 3454 रन्स केले आहेत.

34 वर्षीय सुझी बेट्सने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 124 डावांमध्ये 3471 रन्स केले होते. यामध्ये तिने एक शतक आणि 22 अर्धशतकं झळकावली. तिचा स्ट्राइक रेट 111 होता. श्रीलंकेविरुद्ध तिने 34 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 3505 रन्स झाले आहेत. 

इतकंच नाही तर सुझी गोलंदाजीही करते. तिने आतापर्यंत 50 विकेट्सही घेतल्या आहेत. 26 रन्स देत 4 विकेट्स  ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

रोहित शर्मा टी-20 इंटरनॅशनलमध्ये पुरुषांच्या गटात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. पण सुझी बेट्सने त्याला पछाडलं आहे. रोहितने आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4 शतकं आणि 27 अर्धशतकं झळकावली आहेत. 31 वेळा त्याने 50 पेक्षा जास्त धावांची इनिंग खेळलीये. 118 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.