नवी दिल्ली : जगात सर्वात मोठं नातं हे आई आणि मुलाचं असतं. आई कुठेही असली तरी तिला आपल्या मुलांची चिंता कायम असते. ती गृहणी असो वा कामगार, ती बिझनेस वुमन असेल किंवा खेळाडू... आई ही नेहमी आई असते.
आईला आपल्या पिलांची प्रत्येक क्षणाला काळजी घेत असते. तिला सर्वात प्रथम आपल्या बछड्यांचा विचार मनात येतो. उन असेल तर त्यांना सावली कशी मिळेल आणि थंडी असेल तर त्यांना उब कशी मिळेल यांची काळजी प्रत्येक आई घेत असते. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि तो खूप शेअर केला जात आहे.
हा व्हिडिओ आहे स्वित्झर्लंडची टेनिसपटू पॅटी शनायडर हिचा असून ती डब्ल्यूटीए स्वीस ओपनमध्ये खेळत होती. शनायडरची सामना जर्मनीच्या अॅन्टीनियो लॉटनरसोबत होता. यावेळी पॅटीचे कुटुंबही मैदानावर होते. पहिला सेट पॅटी आपल्या प्रतिस्पर्धीशी ७-६ ने गमावला होता. दुसऱ्या सेटमध्ये बरोबरी सुरू होती. दुसऱ्या सेटचे चार गेम प्रत्येकी दोघांनी जिंकले होते.
A mother is a mother! She may be playing a tennis match but her concern is her little child. pic.twitter.com/Tr5vc0DtVB
— Harsh Goenka (@hvgoenka) July 22, 2017
दुसऱ्या सेटच्या पाचव्या गेममध्ये शनायडर ही लॉटनर सर्विसची वाट पाहत होती. तेव्हा तीने आपल्या पतीला इशारा केला. हा इशारा पाहून पतीने आपल्या मुलाला जॅकीट घातले. पॅटीने बघितले की तिच्या मुलाने स्लिव्हलेस बनियन घातले होते. या वेळी थंड वातावरण होते. त्यामुळे त्याला थंडी वाजेल असे तिला या अटीतटीचा सामना सुरू असताना वाटले.
हा व्हिडिओ उद्योगपती हर्ष गोयंका यांनी शेअर केला आहे.