न्यूझीलंडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, वाचा काय केलाय नेमका पराक्रम!

New Zealand vs Australia : न्यूझीलंडने अखेर करून दाखवलं!

Updated: Oct 22, 2022, 11:33 PM IST
न्यूझीलंडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, वाचा काय केलाय नेमका पराक्रम! title=

Sport News : अखेर सुपर-12 मधील संघांमधील सामन्यांना सुरूवात झाली आहे. आजच्या पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला केन विल्यमसनच्या संघाने पराभवाची धूळ चारली आहे. अवघ्या क्रिकेट जगताचं या सामन्याकडे लक्ष होतं, मात्र न्यूझीलंडने 89 धावांनी दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने पहिल्यांदा कांगारूंना त्यांच्याच भूमित लोळवलं यासोबतच किवींच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 

टी-20 विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यामध्ये न्यूझीलंडने 200 धावांचा डोंगर उभा केला. धावांचं द्विशत करत न्यूझीलंड संघाने आपलाच विक्रम मोडून काढत नवीन विक्रम रचला आहे. विश्वचषकामध्ये न्यूझीलंडने 200 धावांचा डोंगर पहिल्यांदाच केला आहे. कारण याआधी कित्येकदा 200 च्या जवळ आले पण त्यांना धावसंख्या गाठता आली नव्हती. आजच्या सामन्यात 200 धावा ठोकत न्यूझीलंडने विक्रम केला.

न्यूझीलंडने (New Zealand) टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup 2022) गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर (Australia) 89 धावांनी विजय मिळवत शानदार सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 201 धावांचे मजबूत आव्हान दिले होते. मात्र न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा 111 धावांवर 'गेम ओव्हर' झाला.

ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि पॅट कमिन्सचा (Pat Cummins) अपवाद वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला 20 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. मॅक्सवेलने सर्वाधिक 28 आणि पॅटने 21 रन्स केल्या. तर  इतर फलंदाजांना सुरुवात तर चांगली मिळाली. मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मैदानात टीकूच दिलं नाही.

न्यूझीलंडकडून टीम साऊथी आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. ट्रेन्ट बोल्टने 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली. तर लॉकी फर्ग्यूसन आणि इश सोढीने प्रत्येकी 1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.