टीम इंडियासाठी सूर्या ठरला 'संकटमोचक', आफ्रिकेला 'इतक्या' धावांचं आव्हान!

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सूर्याची धमाकेदार खेळी!

Updated: Oct 30, 2022, 06:19 PM IST
टीम इंडियासाठी सूर्या ठरला 'संकटमोचक', आफ्रिकेला 'इतक्या' धावांचं आव्हान! title=

ind vs sa 2022 : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील सामन्यामध्ये भारताने आफ्रिकेसमोर 134 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 68 धावांची खेळी करत भारताचा डाव सावरला. आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय फलंदाजी ढेपाळली, विराट कोहली, के. एल. राहुल आणि रोहित शर्मा फ्लॉप ठरले. (T-20 World Cup 2022 india vs south africa sport marathi news)

भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारताची सुरूवात निराशाजनक झाली, आफ्रिकेच्या वेन पार्नेलने पहिलं षटक तर निर्धाव टाकलं. आफ्रिकेच्या फलंदाजांनी सुरूवातीपासूनच दबाव केला होता. सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा 15 धावा, के.एल. राहुलला 9 धावा आणि विराट कोहलीला 12 धावांवर लुंगी एनगिडीने बाद करत भारताला बॅकफूटवर ढकललं. 

आजच्या सामन्यात अक्षर पटेलच्या जागी दीपक हुड्डाला संधी देण्यात आली होती. मात्र त्यालाही फारशी चमक दाखवता आली नाही.  दीपकला नॉर्खियाने बाद करत भारताला चौथा धक्का दिला. तर दुसरीकडे सूर्य कुमारने एक बाजू लावून धरली होती. वैयक्तिक अर्धशतक करत सूर्याने भारताला 100 धावांचा आकडा पार करून दिला. आज दिनेश कार्तिकही फार काही करू शकला नाही, अवघ्या 6 धावांवर त्याला एनगिडीने बाद केलं.

दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक 4 तर वेन पार्नेलने 3 आणि नॉर्खियाने 1 गडी बाद केला. आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी 134 धावांचं आव्हान आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x