IND vs BAN : टीम इंडियाचा बांगलादेशवर 120 धावांनी दणदणीत विजय

टीम इंडियाने (Team India) बांगलादेशवर 120 धावांनी मात केली आहे. 

Updated: Dec 17, 2022, 04:30 PM IST
IND vs BAN : टीम इंडियाचा बांगलादेशवर 120 धावांनी दणदणीत विजय title=

Ban vs IND : टीम इंडियाने बांगलादेशवर (India vs Bangladesh) दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने (Team India) बांगलादेशवर 120 धावांनी मात केली आहे. यासह टीम इंडियाने तिसऱ्यांदा नेत्रहीन वर्ल्ड कप (T 20 World Cup Cricket Blind Final 2022) जिंकण्याचा कारनामा केलाय. टीम इंडियाने याआधी 2012 आणि 2017 साली वर्ल्ड कप जिंकला होता. (t 20 world cup cricket blind final 2022 team india beat bangladesh by 120 runs and 3rd time world champion)

सामन्याचा धावता आढावा

टीम इंडियाने पहिले बॅटिंग करताना 2 विकेट्स गमावून 277 धावा केल्या. बांगलादेशला वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी 278 धावांचे आव्हान मिळाले. टीम इंडियाकडून  सुनील रमेश आणि अजय कुमार रेड्डी या दोघांनी शतकी खेळी केली.  सुनीलने 136 तर अजयने 100 धावांची खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशने 157 धावांवर शरणागती पत्कारली.

बांगलादेशला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 157 धावाच करता आल्या. बांगलादेशकडून ओपनर सलमानने 77 धावा केल्या, मात्र त्याला बांगलादेशला विजय मिळवून देता आला नाही. टीम इंडियाकडून अजय कुमार रेड्डी आणि ललित मीना या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.  सुनीलने केल्या 136 धावांसाठी त्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं.