पहिल्या चेंडूवर Out करणारा अर्शदीप पहिला नव्हे तर दुसरा खेळाडू, मग पहिला कोण?

चक दे फट्टे! पहिल्या चेंडूवर Out करणारा अर्शदीपने मिळवलं त्या मानाच्या पंक्तीत स्थान!

Updated: Oct 23, 2022, 11:08 PM IST
पहिल्या चेंडूवर Out करणारा अर्शदीप पहिला नव्हे तर दुसरा खेळाडू, मग पहिला कोण? title=

Sport News : भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत पाकिस्तानला झटका दिला होता. साऱ्या क्रिकेट जगताच या सामन्याकडे लक्ष होत मात्र कोणी विचारही केला नसेल अशी खतरनाक सुरूवात होईल. अर्शदीप सिंहने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला तंबूचा मार्ग दाखवला. अर्शदीपने ही कामगिरी करत त्याने मोठ्या यादीत आपल्या नावाचा समावेश केला आहे. 

वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच चेंडूवर भारतीय संघाला आणि वैयक्तिक विकेट घेणारा अर्शदीप सिंह दुसराच खेळाडू ठरला आहे. याआधी हा पराक्रम भारताचा माजी गोलंदाज प्रग्यान ओझाने केला आहे. 2009 च्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरूद्धच्या सामन्यामध्ये प्रग्यान ओझाने बांगलादेशच्या शाकीन अल हसनला बाद केलं होतं. 

युवा अर्शदीप सिंहने केलेल्या आजच्या गोलंदाजीने निवडकर्त्यांचा निर्णय सार्थ ठरवला. पाकिस्तानसोबत हाय व्होल्टेजच्या सामन्यात इतक्या कमी वयात मिळालेल्या संधीचं अर्शदीपने खऱ्या अर्थाने सोनं केलं आहे. अर्शदीपला त्याच्या IPL मधील कामगिरीच्या जोरावर  भारतीय संघात जागा पक्की केली होती. 

भारतीय संघात निवड झाल्यावरही अर्शदीपने आशिया कपमध्ये मोठ्या हिमतीने अखेरच्या षटकांमध्ये बॉलिंग केली होती. त्यामुळेच या नव्या दमाच्या खेळाडूला वर्ल्ड कपच्या स्कॉडमध्येच नाहीतर थेट अंतिम 11 मध्ये स्थान देण्यात आलं. अर्शदीपने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये 3 विकेट्स घेत आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली.