T20 WC: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात भारताचा विजय, शमीची भेदक गोलंदाजी

टी 20 वर्ल्डकपपूर्वीच्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 6 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 186 धावा केल्या आणि विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात सर्वबाद 180 धावा करू शकला. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे.

Updated: Oct 17, 2022, 01:09 PM IST
T20 WC: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात भारताचा विजय, शमीची भेदक गोलंदाजी title=

T20 WC India Vs Australia Warm Up Match: टी 20 वर्ल्डकपपूर्वीच्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 6 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 186 धावा केल्या आणि विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात सर्वबाद 180 धावा करू शकला. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी असणार आहे.

भारताचा डाव

सलामीला आलेल्या केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 78 धावांची भागीदारी केली. मात्र केएल राहुल ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजी फटका मारताना झेल बाद झाला. केएल राहुलने 33 चेंडूत 57 धावा केल्या. या खेलीत 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. त्यानंतर रोहित शर्मा 15 धावा, विराट कोहली 19 धावा, हार्दिक पांड्या 2 धावा, दिनेश कार्तिक 20 धावा आणि आर. अश्विन 6 धावा करून बाद झाले. सूर्यकुमार यादवने एक बाजू सावरून धरली. त्याने 33 चेंडूत 50 धावा केल्या. या खेळीत 6 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. भारताकडून मोहम्मद शमीने 3, भुवनेश्वर कुमारनं 2 आणि हर्षदीप सिंह, हर्षल पटेल आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

भारतीय संघ- केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर. अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, दीपक हुड्डा

ऑस्ट्रेलिया संघ- मिशेल मार्श, आरोन फिंच, स्टीव स्मिथ, ग्लेम मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, जोश इंग्लिस, पॅट कमिन्स, अशटोन अगर, मिचेल स्टार्क, केन रिचर्डसन, जोश हेझलवूड, मॅथ्यू वडे, डेविड वॉर्नर, अॅडम झम्पा