T20 World Cup 2022 : पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर आता पाकिस्तानची क्रिकेट प्रेमी टीम इंडियाच्या विजयाची प्रार्थना करत आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाला पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना उर्वरित सामने जिंकावे लागणार आहेत. भारताकडून 4 विकेट्सने पहिला सामन्यात पराभव झाल्यानंतर झिम्बॉम्बने संघाने 1 रनने दुसऱ्या सामन्यात पराभव सहन करावा लागला. त्यामुळे पाकिस्तानी संघाचे भवितव्य आता टीम इंडियाच्या हातात आहे.
पाकिस्तानला (Pakistan cricket Team) सेमीफायनल खेळायची असेल तर त्यांना टीम इंडियाचा विजयाची प्रार्थना करावी लागणार आहे. एकीकडे पाकिस्तानला आता आपले उर्वरित सर्व सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागणार आहेत. टीम इंडियाने सगळे सामने जिंकले तर गट 2 मध्ये एकूण 10 गुण होतील आणि हा संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करणारा पहिला संघ ठरेल. भारतीय संघाला येत्या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि झिम्बाब्वेचा सामना करावा लागणार आहे. दोन उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी टीम इंडिया सर्व सामने जिंकेल.
भारताचे सर्व सामने जिंकूनही पाकिस्तानी संघ उपांत्य फेरी गाठू शकणार नाही. त्यासाठी आफ्रिकन संघ भारताकडून पराभूत झाल्यानंतर आणखी दोन सामने कोणत्याही संघाकडून हरतो का, यावरही पाकिस्तानी संघ अवलंबून आहे. ज्यामध्ये फक्त पाकिस्तानला एका सामन्यात आफ्रिकन संघावर मात करावी लागणार आहे. म्हणजेच एक प्रकारे पाहिले तर पाकिस्तानला आता उपांत्य फेरी गाठणे जवळपास अशक्य आहे.कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ ज्या फॉर्ममध्ये आहे, तिथून तीन सामने हरणे शक्य नाही. क्रिकेटच्या खेळात काहीही घडू शकत असले तरी जेव्हा पाकिस्तानचा संघ झिम्बाब्वेविरुद्धचा सामना हरू शकतो तेव्हा दक्षिण आफ्रिकेला का नाही.
काय घडलं मॅचमध्ये?
T20 विश्वचषकातील पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील रोमहर्षक सामन्यात प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वेने 8 गडी गमावून 130 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 8 गडी गमावून 129 धावाच करू शकला. या सामन्यातील पराभवानंतर जगभरात पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवली जात आहे. पाकिस्तानने आत्तापर्यंत 2 सामने खेळले आहेत आणि ते दोन्ही सामने गमावले आहेत. ज्यामुळे या स्पर्धेत त्यांचा पुढचा मार्ग कठीण झाला आहे.