पर्थ : टीम इंडियाचा (Team India) कट्टर प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तानला गुरुवारी झिम्बाब्वे (Pakistan vs Zimbabwe) सारख्या दुबळ्या संघाविरोधात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली होती. पाकिस्तानच्या या पराभवानंतर दिग्गज क्रिकेटर्सनी खेळाडूंना चांगलेच फैलावर घेतले होते. त्यात आता एका पाकिस्तानी खेळाडूने झिम्बाब्वेविरुद्धच्या (Pakistan vs Zimbabwe) पराभवाची जबाबदारी स्विकारली आहे. या संदर्भात त्याने सोशल मीडियावर पोस्ट देखील लिहली आहे. हा खेळाडू कोण आहे ते जाणून घेऊयात.
हे ही वाचा : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यापुर्वी दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाला मोठा इशारा
टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World cup) पाकिस्तानला दुबळ्या झिम्बाब्वेकडून 1 धावाने पराभूत व्हाव लागलं होतं. हे बलाढ्य पाकिस्तानला न पचणार होतं. या पराभवानंतर पाकिस्तानची (Pakistan) चांगलीच लाज गेली आहे. त्यात आता पाकिस्ताच्या एका खेळाडूने झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवाची जबाबदारी स्विकारली आहे.
पाकिस्तानचा खेळाडू शान मसूदने (Shan Masood) झिम्बाब्वे विरूद्धच्या पराभवाला स्वत:ला जबाबदार ठरवले आहे. या संदर्भात त्याने सोशल मीडियावर पोस्ट देखील लिहली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणाला की, 'मी सामना संपवण्याच्या एका चांगल्या स्थितीत होतो. परंतु ते होऊ शकले नाही. मी याची संपुर्ण जबाबदारी माझ्यावर घेतो, असे तो म्हणाला आहे.
शान मसूद (Shan Masood) पुढे म्हणाला की, हे काही खेळ असतात, जे तुम्ही तुमच्या देशासाठी जिंकले पाहिजेत, मी खूप निराश आहे, असे म्हणत त्याने झिम्बाब्वे विरूद्धच्या पराभवाची जबाबदारी स्विकारली.
हे ही वाचा : भारत की दक्षिण आफ्रिका? टी20 मध्ये कोणाचं पारडं जड? जाणून घ्या
पाकिस्तानच्या वतीने शान मसूदने (Shan Masood) झिम्बाब्वेविरुद्ध चांगली लढत दिली. या सामन्यात त्याने 38 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. मात्र, मसूद पाकिस्तानला सामना जिंकून देऊ शकला नाही आणि सामन्याच्या महत्त्वाच्या वेळी त्याला झिम्बाब्वेचा अष्टपैलू सिकंदर रझा याच्या चेंडूचा फटका बसला आणि यष्टिरक्षक चकावाने त्याला शानदार स्टंपिंग करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मसूदनंतर पाकिस्तानचा संघ सामन्यात पुनरागमन करू शकला नाही आणि अखेर या सामन्यात 1 धावेने पराभव पत्करावा लागला.
दरम्यान T20 वर्ल्ड कपच्या 24 व्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा (Pakistan vs Zimbabwe) पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानच्या टॉप-4मध्ये येण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.