टीम इंडिया ऐनवेळी बदलणार WC ची टीम? 'या' खेळाडूंचं नाव चर्चेत

आता T20 वर्ल्डकप सुरु होण्यासाठी फक्त दोन आठवडे उरलेत.

Updated: Sep 29, 2022, 11:50 AM IST
टीम इंडिया ऐनवेळी बदलणार WC ची टीम? 'या' खेळाडूंचं नाव चर्चेत

मुंबई : आता T20 वर्ल्डकप सुरु होण्यासाठी फक्त दोन आठवडे उरलेत. ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्डकपसाठी जवळपास 16 टीम आमनेसामने येणार आहेत. दरम्यान भारताने टीम जाहीर केली असून दुखापतीमुळे अनेक खेळाडू त्रस्त आहे. टीम इंडियाला अजूनही टीममध्ये बदल करण्याची संधी आहे आणि शेवटच्या क्षणी काही खेळाडूंना T20 वर्ल्डकपच्या टीममध्ये आणलं जाऊ शकतं.

टीम कशी आणि कधी बदलता येईल?

आयसीसीच्या नियमांनुसार, 9 ऑक्टोबरपर्यंत टी-20 वर्ल्डकपच्या टीममध्ये बदल केले जाऊ शकतात. त्याचबरोबर थेट सुपर-12 मध्ये पोहोचलेल्या टीमसाठी ही संधी 15 ऑक्टोबरपर्यंत आहे. म्हणजेच 15 ऑक्टोबरपर्यंत टीम इंडिया आपल्या टीममध्ये बदल करू शकते. यानंतरही काही घडलं तर आयसीसीची विशेष परवानगी घेऊन भारत आपल्या टीममध्ये बदल केला जाऊ शकतो.

टीम इंडिया दुखापतीने हैराण

टी-20 वर्ल्डकपसाठी जेव्हा टीम जाहीर होणार होता तेव्हापासूनच टीम इंडियाचा तणाव वाढत आहे. रवींद्र जडेजाला दुखापत झाली, त्यामुळे तो टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला. त्यानंतर दीपक हुडाला दुखापत झाली, जो T20 वर्ल्डकप टीमचा भाग आहे. यानंतर आता जसप्रीत बुमराहबद्दल शंका व्यक्त केली जातेय.

कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते?

भारताने T20 वर्ल्डकप टीमसाठी 15 खेळाडूंची घोषणा केली असून, चार खेळाडूंना स्टँडबायवर ठेवण्यात आलंय. टीममध्ये बदल झाल्यास या चार खेळाडूंपैकी एकालाच प्रथम प्रवेश करता येईल. ज्यामध्ये मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर यांचा समावेश आहे. त्याच बरोबर त्यांच्या बाहेरच्या खेळाडूंना आणलं तर संजू सॅमसन, इशान किशन यांसारखी नावं आघाडीवर आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x