Captain Injury: टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून पहिली टेस्ट मॅच सध्या खेळवली जातेय. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाच्या फलंदाजांची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मात्र सामना सुरु असताना दक्षिण आफ्रिकेच्या टीमला एक मोठा धक्का बसला आहे. याचं कारण म्हणजे टीमचा कर्णधार दुखापतग्रस्ती झाला असून त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.
मंगळवारी दक्षिण आफ्रिकेची टीम पहिल्यांदा फिल्डींगसाठी मैदानात आली होती. यावेळी फिल्डींग करताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला दुखापत झाली. ही दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी फिल्डिंगला वियान मुल्डर ( Wiaan Mulder ) उतरला होता. बावुमाची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अजून माहिती मिळालेली नाहीये.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धची पहिली टेस्ट सेंच्युरियन स्टेडियममध्ये खेळवली जातेय. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाला डाव्या हाताच्या दुखापतीमुळे मंगळवारी मैदान सोडावं लागलं. या सामन्यात तो पुढे खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. मार्को जॅनसेनवर विराट कोहलीचा ड्राईव्ह रोखण्याच्या प्रयत्नात बावुमा जखमी झाला. भारताच्या डावाच्या 20व्या ओव्हरमध्ये त्याला मैदान सोडावे लागले.
क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) यांच्या सांगण्यानुसार, 'स्कॅन्सवरून असं दिसून आलंय आहे की टेंबा बावुमाच्या डाव्या हाताच्या हॅमस्ट्रिंगमध्ये ताण आला आहे. या सामन्यात पुढे खेळण्यासाठी त्याला डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी लागेल.
बावुमाने फिल्ड सोडल्यानंतर डीन एल्गर ( Dean Elgar ) कार्यवाहक कर्णधार म्हणून टीमची धुरा सांभाळली. मुख्य म्हणजे या सिरीजनंतर एल्गरने निवृत्ती जाहीर केलीये. बावुमाच्या जागी वियान मुल्डर मैदानात उतरला होता.
बावुमाने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित दिलं होतं. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपला. भारताने 8 विकेट्स गमावून 208 रन्स केलेत. केएल राहुल 'ट्रबलशूटर'च्या भूमिकेत दिसला. त्याने आतापर्यंत 105 बॉल्समध्ये 10 फोर आणि 2 सिक्सेस 70 रन्स केलेत. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने आतापर्यंत 5 विकेट्स घेतलेत.