हे 3 भारतीय बॅट्समॅन एकदाही नाही झाले ODI मध्ये आऊट, काही मॅच खेळताच संपलं क्रिकट करीअर

हे तीन भारतीय फलंदाज नक्की आहेत तरी कोण याबद्द्ल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Updated: Oct 15, 2021, 01:17 PM IST
हे 3 भारतीय बॅट्समॅन एकदाही नाही झाले ODI मध्ये आऊट, काही मॅच खेळताच संपलं क्रिकट करीअर title=

मुंबई : क्रिकेटच्या इतिहासात एकापेक्षा एक फलंदाज आपण पाहिले आहेत, ज्यांनी धावांचा डोंगर उभारुन अनेक शतके केली आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की, असे काही भाग्यवान फलंदाज आहेत जे त्यांच्या वनडे कारकिर्दीत एकदाही आऊट झालेले नाहीत. हो हे खरं आहे असे तीन भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत, जे एकदिवसीय सामन्यात कधीही बाद झाले नाहीत,

परंतु लोकांना या खेळाडूंचा विसर पडला आहे. हे तीन भारतीय फलंदाज नक्की आहेत तरी कोण याबद्द्ल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सौरभ तिवारी

जेव्हा सौरभ तिवारीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले तेव्हा त्याला धोनीचा डुप्लिकेट म्हटले गेले. सौरभ तिवारीचे लांब केस पाहून लोक त्याची तुलना धोनीशी करायचे. सौरभ तिवारीने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत टीम इंडियामध्ये स्थान मिळवले. सौरभ तिवारीने 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

सौरभ तिवारी टीम इंडियासाठी फक्त तीन एकदिवसीय सामने खेळला, ज्यामध्ये त्याला फक्त दोनच डावांमध्ये फलंदाजी करता आली. या दोन्ही डावांमध्ये सौरभ तिवारी नाबाद राहिला. परंतु यानंतर त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

फैज फजल

फैज फजलने घरगुती क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि हेच कारण होते की त्याला टीम इंडियामध्येही संधी देण्यात आली, पण हा खेळाडू टीम इंडियासाठी फक्त एकच वनडे सामना खेळला. 2016 मध्ये खेळल्या गेलेल्या या एकदिवसीय सामन्यात फैज फजलने झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 55 धावा केल्या. या शानदार अर्धशतकानंतरही त्याला संघातून वगळण्यात आले आणि तो अजूनही संघात परतण्याचा मार्ग शोधत आहे.

भरत रेड्डी

भरत रेड्डीचे नाव आजच्या तरुणांना माहीत देखील नसेल, पण या खेळाडूला भारतासाठी फक्त तीन एकदिवसीय सामने खेळायला मिळाले. भरत रेड्डीने भारतासाठी 1978 ते 1981 पर्यंत तीन एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्याला दोनदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि तो दोन्ही वेळा नाबाद राहिला. यानंतर भरत रेड्डीला देखील टीम इंडियामधून बाहेर ठेवले गेले आणि त्याच्या कारकिर्दीचा इतरांप्रमाणे दुःखद शेवट झाला.