आता 'लंका' दहनासाठी विराट सेना सज्ज!

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेचा पराभव करण्यासाठी भारतीय संघ उद्या मैदानात उतरेल.

Updated: Jun 7, 2017, 09:19 PM IST
आता 'लंका' दहनासाठी विराट सेना सज्ज! title=

लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेचा पराभव करण्यासाठी भारतीय संघ उद्या मैदानात उतरेल. याआधीचा सामना जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे, त्यामुळे विराट सेना कोणत्याही दडपणाविषयी मैदानात उतरेल.

याउलट श्रीलंकन वाघांची अवस्था मात्र काहीशी बिकट आहे. श्रीलंकेला आपल्या पहिल्याच मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून 96 रन्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यातच दुखापतीमुळे पहिल्याच मॅचला मुकणारा श्रीलंकन कॅप्टन अँजेलो मँथ्यूज भारताविरोधात खेळणार का याबाबत सस्पेन्स आहे.

आफ्रिकन बॅट्समन्सनी श्रीलंकन बॉलर्सची धुलाई करत तीनेशहून अधिक रन्स काढले होते. त्यामुळे मलिंगा व्यतिरिक्त फारसा अनुभव नसणा-या लंकन बॉलर्सचा भारतीय बॅट्समनपुढे कस लागणार आहे. ही मॅच जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित करण्याची भारताला संधी आहे.