मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचं काही वर्षापुर्वीचं पत्नी हसीन जहानसोबत घटस्फोट झाला होता. या घटस्फोटानंतर कोणत्याही व्यक्तीसोबत त्याचे नाव चर्चेत आलं नव्हत. मात्र आता अखेर त्याच्या आयुष्यात तिची एन्ट्री झाली आहे. या संबंधित फोटोही आता समोर आले आहे.
मोहम्मद शमी कार आणि बाईक्सचा खुपच शौकीन आहे.कारण तो नेहमीच लक्झरी वाहन खरेदी करत असतो. आता नुकतीच त्याने स्पोर्टस कार खरेदी केली आहे. त्यामुळे तिच्या आगमनाने त्याच्या आयुष्यात मोठा आनंद आला आहे.
मोहम्मद शमी सध्या क्रिकेटपासून दूर असला तरी त्याने स्वत:साठी एक नवीन लक्झरी स्पोर्ट्स कार खरेदी केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 150 विकेट्सचा पराक्रम केल्यानंतर शमीने स्वतःला ही कार गिफ्ट केली आहे.
फिचर्स आणि किंमत किती?
शमीने शुक्रवारी लाल रंगाची जग्वार एफ-टाइप कार खरेदी केली आहे. ही एक स्पोर्ट्स कार आहे. जी 3.7 सेकंदात 100 चा वेग गाठते. या नवीन स्पोर्ट्स कारचे शक्तिशाली इंजिन V8 331 kW आहे. ज्यामुळे ही कार इतक्या कमी सेकंदात 100 चा वेग पकडते. या कारची शोरूम किंमत 98.13 लाख रुपये आहे. ऑन रोड या कारची किंमत एक कोटींहून अधिक असेल. या कारमध्ये 8 स्पीडपर्यंत ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहेत.
दरम्यान शमीच्या मालकीची ही पहिली नवीन लक्झरी कार नाही. त्याच्याकडे अनेक गाड्या आहेत. शमीकडे टोयोटा फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यू 5 सीरीज आणि ऑडी कार देखील आहे. नुकताच उत्तर प्रदेशचा राहणारा शमीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याने त्याच्या रॉयल एनफिल्ड जीटी 650 या बाइकची झलक दाखवली होती.