टीम इंडियाचं जोरदार कमबॅक, अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील महत्त्वाचा सामना शेख झायेद स्टेडियम, अबू धाबी येथे पार पडला. 

Updated: Nov 3, 2021, 11:30 PM IST
टीम इंडियाचं जोरदार कमबॅक, अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय title=

Ind vs Agf : भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 विश्वचषक 2021 च्या 33 वा सामना भारताने जिंकला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील महत्त्वाचा सामना शेख झायेद स्टेडियम, अबू धाबी येथे पार पडला. टीम इंडियाने हा सामना 66 रन्सने जिंकला आहे.

टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव करत शानदार कमबॅक केलं आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 2 गडी गमावून 210 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 7 गडी गमावून केवळ 144 धावा करू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने 3, रवी अश्विनने 2 बळी घेतले. तर जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारताच्या 211 धावांना प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तानच्या 5 विकेट अवघ्या 69 धावांत पडल्या. रविचंद्रन अश्विनने नजीबुल्ला झद्रानला बाद करत त्याची दुसरी विकेट घेतली. 14 षटकांनंतर अफगाणिस्तानची धावसंख्या 5 विकेटवर 85 धावा होती.

टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्ध या टी-20 विश्वचषकातील सर्वात मोठी धावसंख्या उभी केली. 20 षटकांनंतर भारताची धावसंख्या 2 बाद 210 धावांवर होती. भारताकडून रोहित शर्माने 74, केएल राहुलने 69, हार्दिक पांड्याने नाबाद 35 आणि ऋषभ पंतने नाबाद 27 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून गुलबुद्दीन नायब आणि करीम जन्नत यांनी 1-1 विकेट घेतली.