Rohit Sharma: टीममधील खेळाडू सुस्त आहेत...! कॅप्टन्सीच्या कथित वादादरम्यान रोहितचा रोख कोणाकडे?

Rohit Sharma: रोहित शर्माने ( Rohit Sharma ) टीम इंडियातील खेळाडूंबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Apr 3, 2024, 09:51 AM IST
Rohit Sharma: टीममधील खेळाडू सुस्त आहेत...! कॅप्टन्सीच्या कथित वादादरम्यान रोहितचा रोख कोणाकडे? title=

Rohit Sharma: गेल्या काही दिवसांपासून आयपीएलमधील कॅप्टन्सीच्या कथित वादामुळे रोहित शर्मा चर्चेत आहे. अशातच आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि फलंदाज श्रेयस अय्यर नेटफ्लिक्सचा शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये सहभागी झाले होते. हा शो नुकताच लॉंच झाला असून या शोच्या दरम्यान रोहित शर्माने ( Rohit Sharma ) टीम इंडियातील खेळाडूंबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. 

'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या पहिल्या एपिसोडमध्ये रणबीर कपूर त्याची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमासोबत सहभागी झाले होते. यानंतर आता टीम इंडियाचा कर्णधार त्याचा मुंबईचा सहकारी श्रेयस अय्यरसोबत शोमध्ये येणार आहे. प्रोमोमध्ये रोहित शर्माची ( Rohit Sharma ) पत्नी रितिका सजदेह देखील प्रेक्षकांमध्ये दिसली होती.

शोचा प्रोमो झाला व्हायरल

शोच्या प्रोमोचा काही भाग सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) त्याच्या मजेशीर अंदाजात दिसतोय. शोच्या प्रमोशनदरम्यान कपिल शर्माने रोहितला ( Rohit Sharma ) विचारलं की, आजकाल स्टंपवर माइक लावले जातात. तु कधी रागाच्या भरात कोणाला शिव्या दिल्या आहेत का? यावर रोहितने मजेशीर उत्तर दिले - मी काय करू, आमची ही मुलं आळशी आहेत ( कर भी क्या सकता हूं, ये हमारे लड़के सुस्त मुर्गे हैं, भागते नहीं हैं ), अजिबात धावत नाहीत. दरम्यान रोहितचं हे वाक्य ऐकून प्रेक्षकांचाही हशा पिकला.

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची खराब सुरुवात

यंदाची आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अनेक मोठे बदल घडले. यावेळी रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवल्यानंतर चाहते संतापले. इतंकच नाही तर सिझनची सुरुवातही मुंबईसाठी खूपच खराब झाल्याचं दिसून येतंय. सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलच्या तळाशी आहे. गुजरात टायटन्सविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर मुंबई सनरायझर्सने हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धचे सामनेही गमावले आहेत.