तेलंगणा निवडणूक : बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा भडकली

ज्वाला गुट्टा हिचं नावच मतदार यादीमधून गायब 

Updated: Dec 7, 2018, 04:43 PM IST
तेलंगणा निवडणूक : बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा भडकली

हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी सुरक्षा व्यवस्थेसहीत मतदान सुरू आहे. मतदानाची प्रक्रिया सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालीय. राज्याच्या ११९ विधानसभा जागांसाठी निवडणूक होतेय. या दरम्यान बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा हिचं नावच मतदार यादीमधून गायब झाल्याचं समोर आलंय. यावर ज्वालानं सोशल मीडियावर जाहीररित्या नाराजगी व्यक्त केलीय. 

ज्वाला गुट्टानं सकाळी मतदानाचं आवाहन करणारं एक ट्विट केलं होतं. यानंतर ज्वाला स्वत: मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाली. परंतु, ज्वालाचं नावच मतदान यादीतून गायब होतं... मतदान यादीत नावच नसल्यानं निराश झालेल्या ज्वालानं आपला संताप ट्विटरवर व्यक्त केला.

Jwala Gutta Tweet
ज्वाला गुट्टाचं ट्विट

'ऑनलाईन नाव पाहिल्यानंतर मतदान यादीत नाव नसल्याचं लक्षात आल्यानं मला धक्का बसलाय. ही निवडणूक योग्य कशी असू शकते जेव्हा तुमचं नाव मतदार यादीतून रहस्यमयरित्या नाहीसं होतं असेल' असं ज्वाला गुट्टानं सोशल मीडियावर म्हटलंय. 

दरम्यान, बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू आणि माजी बॅडमिंटन खेळाडू-कोच पुलेला गोपीचंद यांनी तेलंगणात मतदानाचा हक्क बजावलाय.