एक-दोन नव्हे तर 2500 मुलींसोबत SEX, हा खेळाडू आहे तरी कोण ?

बेडरूममध्ये एकापेक्षा जास्त मुली आवडतात, प्लेबॉय सारखं आयुष्य जगणारा हा खेळाडू आहे तरी कोण ? 

Updated: Jun 30, 2022, 02:35 PM IST
एक-दोन नव्हे तर 2500 मुलींसोबत SEX, हा खेळाडू आहे तरी कोण ?

मुंबई : मनसोक्त आयुष्य जगण प्रत्येकाच्या वाट्याला येत नसतं. अरबपती अथवा खेळाडूंच्याच वाट्याला असे जगणे येत असल्याची शक्यता आहे. अशाच मनसोक्त जगणाऱ्या एका महान खेळाडूने तब्बल लग्नापुर्वी 2500 महिलांसोबत सेक्स केल्याचा दावा त्याच्या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. खेळाडू असून ही इतका सेक्स करणारा हा खेळाडू कोण आहे तो जाणून घेऊयात. 

रोमानियाचा माजी जागतिक नंबर 1 टेनिसपटू इली नास्तासे प्लेबॉयसारखे आयुष्य जगण्यासाठी प्रसिद्ध आहे. महान टेनिसपटू म्हणून त्याची टेनिस विश्वात ओळख आहे. अनेक चषक आणि पदके त्याने पटकावली आहेत. दरम्यान इली नास्तासेने पत्नीला भेटण्यापूर्वी 2,500 मुलींसोबत सेक्स केला असल्याचा दावा त्याच्या आत्मचरित्रात केला होता. 

आत्मचरित्रातील दाव्यावर काय म्हणाला?

इली नास्तासेचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाल्यानंतर त्याने डेली मेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत नास्तासेने म्हणाला होता की, मला महिला आवडतात आणि महिलांवर प्रेम करणे सामान्य असल्याचे त्याने सांगितल होते.  

2500 मुलींसोबतच्या सेक्सच्या चर्चेवर नस्तासे म्हणाले की, नाही इतक्या नाही. माझ्या आत्मचरीत्रात ही गोष्ट बढून चढून सांगितलीय.पुस्तकाचा खप वाढावा यासाठी असा आकडा सांगितला गेलाय.  मात्र, नेमका आकडा विचारला असता त्यांनी मजेशीर उत्तर दिले.

 नास्तासे म्हणाले की, मला माहित नाही 300- 400 असतील ? मी कधीच मोजले नाही. मला बर वाटत नाही. मला आठवत नाही?असे त्याने सांगितले. तसेच जरी मी आकडा 2500 किंवा 500 सांगितला तर यासाठी मला कोणीही पदक देणार नाही, असा सवाल देखील त्याने केला. पण त्यात अनेक मुली होत्या असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. 

खेळादरम्यान मुलींकडून आलेल्या ऑफर्सबद्दल नस्तासे म्हणाली की, मी नकार द्यायचो. कधी-कधी मी खूप थकून जायचो कारण मला टेनिस खेळायचे होते, असे ते म्हणतात. मॅक्सिमच्या 'लिव्हिंग सेक्स लीजेंड्स'च्या यादीत नास्तासेला सहावे स्थान मिळाले आहे.

बायको काय म्हणाली?

रोमानियन मॉडेल अमालिया टिओडोस्कू त्याची तिसरी पत्नी बनली. ते दोघे 2004 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. अमालियाने 2500 मुलींच्या नास्तासेच्या दाव्याबद्दल सांगितले की, ती या गोष्टीने खुप खुश आहे की, तिने अशा व्यक्तीला जीवनसाथी बनवलाय, असे ती म्हणते. मात्र दोघांच्या लग्नाच्या 6 वर्षानंतर 2010 मध्ये दोघेही वेगळे झाले. 

2013 मध्ये नास्तासेने रोमानियन फॅशन मॉडेल ब्रिजिट एस्फाटशी लग्न केले. त्यानंतर 2018 मध्ये दोघेही वेगळे झाले. यानंतर, 2019 मध्ये, त्याने आपल्यापेक्षा 30 वर्षांनी लहान असलेल्या आयोना सिमिओनशी लग्न केले.