मुंबई: कोरोना काळात अनेकांच्या नोकरऱ्या गेल्या. काहींनी नवीन व्यवसाय सुरू केले तर काहीजण आजही नोकरीच्या शोधात आहेत. कोव्हिडच्या काळातही चर्चा आहे ती या महिलेची. या महिला अॅथलीटने केवळ खेळूनच नाही तर इतर गोष्टींमधून देखील पैसे मिळवले आहेत. आज जगात महिला खेळाडूंमध्ये सर्वात जास्त पैसे कमवण्याचा विक्रम तिने केला आहे.
जपानची स्टार टेनिसपटू नाओमी ओसाकाने कमाईच्या बाबतीत इतिहास रचला. गेल्या 12 महिन्यांत तिने कोर्टाबाहेर 50 मिलियन डॉलर्स (सुमारे 400 कोटी रुपये) कमावले हा देखील एक अनोखा विक्रमच म्हणावा लागेल. ती इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारी महिला अॅथलीट ठरली आहे. ओसाकाने 2018 मध्ये अमेरिकन दिग्गज महिला खेळाडू सेरेना विलियम्स पराभव करून US ओपनची ट्रॉफी आपल्या नावावर करून घेतली.
नाओमी ओसाकाने त्याच्या 4 महिन्यांनंतर दुसरा ग्रॅण्डस्लॅम पुरस्कार पटकवला. ऑस्ट्रेलिया ओपनच्या महिला एकेरीमध्ये पेत्रा क्वितोवालाअंतिम सामन्यात पराभूत करून पुरस्कार जिंकला आहे. तिच्या देदिप्यमान कामगिरीचं जगभरात कौतुक होत आहे.
दोन ग्रॅण्ड स्लॅम जिंकणारी ती पहिली जपानी महिला खेळाडू ठरली होती. 12 महिन्यांमध्ये ओसाकाने 2 ग्लॅण्डस्लॅम आपल्या नावावर केले. 2020मध्ये US ओपनचा पुरस्कारही तिने पटकावला आहे. 23 वर्षांच्या ओसाकाच्या खेळावर प्रभावित होऊन अनेक कंपन्यांनी तिच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केलं आहे.
12 महिन्यांमध्ये तिने 55.2 मिलियन अमेरिकी डॉलर्स खेळामधून कमवले आहेत. तर उर्वरित रक्कम ही तिला इतर कंपन्यांनी तिच्यासोबत केलेल्या कॉन्ट्रॅक्टमधून मिळाले आहेत. ओसाका स्पोर्टिकोच्या जगात सर्वाधिक कमाई करणारी महिला असून 15 व्या स्थानावर आहे.