मुंब झिम्बाब्वे आणि बांग्लादेश यांच्यात सध्या टेस्ट मॅच सुरु आहे. दरम्यान या मॅचमध्ये भर मैदानात दोन खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या दोन्ही खेळाडूंमध्ये इतकी वादावादी वाढली की या दोन्ही खेळाडूंनी सर्व मर्यादा पार केल्या.
सामन्यादरम्यान बांगलादेशचा क्रिकेटपटू तस्कीन अहमद आणि झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजाराबानी या दोन खेळा़डूंमध्ये वादावादी पहायला मिळासी. लाइव्ह सामन्यादरम्यान ब्लेसिंग मुजाराबानी आणि तस्कीन अहमद यांच्यातील हा वादाता व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
झिम्बाब्वेचा फास्ट बॉलर ब्लेसिंग मुजराबानी याच्या एक शॉर्ट बॉलवर बांगलादेशच्या तस्कीन अहमद चुकला आणि बॉल विकेटकीपरकडे गेला. अशा परिस्थितीत तस्कीन अहमदने चेंडू मिस केल्यानंतर विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया दिली, हे पाहून गोलंदाज संतापला.
मग बॉलर मुजराबानी बॅटीग करत असलेल्या तस्कीनकडे गेला. दोघंही खेळाडू एकमेकांकडे रागारागाने पाहू लागले. बांगलादेशच्या डावाच्या 85 व्या ओव्हरमध्ये ही घटना पहायला मिळाली. दरम्यान, दोन्ही खेळाडूंमधील हे प्रकरण चांगलेच चर्चेत आलंय.
भर मैदानात या दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली. प्रकरणं इतकं तापलं की एकही जण मागे हटण्यास तयार नव्हता.