स्वप्न खरं झालं, वर्ल्ड कप निवडीनंतर दिनेश कार्तिकची प्रतिक्रिया

वर्ल्ड कपला ३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे.  

Updated: Apr 16, 2019, 12:59 PM IST
स्वप्न खरं झालं, वर्ल्ड कप निवडीनंतर दिनेश कार्तिकची प्रतिक्रिया title=

कोलकाता : वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची १५ एप्रिलला घोषणा झाली. त्यामध्ये जवळजवळ काही खेळा़डूंचे स्थान निश्चितच होते. पंरतु टीममध्ये अतिरिक्त विकेटकीपर म्हणून कोणाला स्थान मिळणार यासाठी अनुभवी दिनेश कार्तिक आणि युवा ऋषभ पंतमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. पंरतु निवड समितीने दिनेश कार्तिकला टीममध्ये स्थान दिले.

'माझी निवड वर्ल्ड कप टीमसाठी झाल्याने मी आनंदी आहे. मी खूप उत्साहित आहे. मी भारतीय टीमचा गेल्या काही वर्षापासून एक भाग म्हणून खेळतोय. त्याचा मला सार्थ अभिमान वाटतोय. वर्ल्ड कपसाठी माझी निवड होणे हे माझ्यासाठी स्वप्नवतच आहे. माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतयं.' असं दिनेश कार्तिक म्हणाला. 

आयपीएल मधील कोलकाता टीमच्या वेबसाईट सोबत दिनेश कार्तिक बोलत होता. 'एक टीम म्हणून आम्ही काही विशेष कामगिरी केली आहे. ही विशेष कामगिरी करण्यामध्ये  माझा देखील थोडाफार हातभार लागला आहे. आपली निवड वर्ल्ड कप टीमसाठी व्हावी असे मला मनोमनी वाटतं होतं'. असे कार्तिक म्हणाला.

तब्बल १२ वर्षांनी संधी

दिनेश कार्तिकची २०१९ च्या ५० ओव्हरच्या वर्ल्ड कप टीममध्ये अंतिम १५ खेळाडूंमध्ये निवड झाली आहे. कार्तिकचे तब्बल १२ वर्षांनी वर्ल्ड कपटीमसाठी निवड झाली आहे. याआधी २००७ साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळाली होत. पंरतु त्याची निवड अंतिम-११ मध्ये न झाल्याने त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. या वर्ल्डकप मध्ये भारतीय टीम पात्रता फेरीमधून बाहेर पडली होती.  यंदाच्या वर्ल्ड कपला ३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे.

ऋषभला डच्चू

युवा ऋषभ पंतला वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये स्थान देण्यात येईल. अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात होती. परंतु निवड समितीने अनुभवला झुकतं माप देत दिनेश कार्तिकला संधी दिली.  पंतची निवड का केली नाही, यावर निवड समितिचे अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले की, 'पंतची आम्ही निवड करणार होतो, परंतू पंत विकेटकीपींग कौशल्यात कमी पडला. त्याच्या तुलनेत दिनेश कार्तिक हा बॅटिंग आणि किपींग दोन्ही बाबतीत अनुभवी असल्याने आम्ही पंतला टीममध्ये समाविष्ठ केले नाही.' 

वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, केएल राहुल, विजय शंकर.