The Great Khaliवर कोसळला दु:खाचा डोंगर; पहाडासारखा खली ढसाढसा रडला

द ग्रेट खली अर्थात दलीप सिंहनं 'या' कारणामुळे आईला गमवलं

Updated: Jun 21, 2021, 01:54 PM IST
The Great Khaliवर कोसळला दु:खाचा डोंगर; पहाडासारखा खली ढसाढसा रडला title=

मुंबई: The Great Khali नं आपल्या सर्वात जवळची व्यक्ती गमवली आहे. त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यामुळे पहाडासारखा खली आपल्या आईला गमावल्यानंतर ढसाढसा रडला. WWEचा स्टार रेसलर द ग्रेट खली याच्या आईचं निधन झालं. त्यामुळे खली पुरता कोलमडला आहे. 

रेसलर खली उर्फ दलीप सिंहची आई टांडी देवी यांनी रविवारी रात्री उशिरा उपचारा दरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दीर्घकाळापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. खलीच्या आईला हृदय आणि फुफ्फुसाचा त्रास होता. 

मिळालेल्या माहितीनुसार 14 जून रोजी खलीच्या आईला  डीएमसी पीआरओ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आईची कोरोना चाचणीही करण्यात आली. त्यावेळी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. प्रकृती खालवल्यामुळे खलीच्या आईला व्हेटिलेटरवर ठेवण्यात आलं. 

टंडा देवी यांच्यावर सोमवारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. रुग्णालयानं दिलेल्या माहितीनुसार मल्टीपल ऑर्गन फेल्युयरमुळे टंडा देवी यांचं निधन झालं. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवने ट्वीट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.