मैदाना झालं आता बॉलिवूड गाठलं... दिग्गज क्रिकेटपटून 'या' सिनेमात करणार लीड रोल

क्रिकेटच्या मैदानात तुफान बॉलिंगनंतर बॉलिवूडमध्ये करणार जलवा, 'या' सिनेमात करणार लीड रोल

Updated: Jun 21, 2021, 11:22 AM IST
मैदाना झालं आता बॉलिवूड गाठलं... दिग्गज क्रिकेटपटून 'या' सिनेमात करणार लीड रोल

मुंबई: भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याने मैदानात आपल्या कामगिरीनं जलवा केला. आता क्रिकेटच्या मैदानातून थेट बॉलिवूडमध्ये आपली छाप उठवण्यासाठी जात आहे. एस श्रीसंत एका सिनेमात लीड रोल करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या बातमीमुळे क्रिकेटप्रेमींना खूप आनंद झाला आहे. 

श्रीसंतने कॅप्टन कूल धोनीच्या नेतृत्वामध्ये 2007मध्ये टी 20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्डकपसाठी खेळला होता. तो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाला होता. 2013मध्ये आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंगमध्ये अडकल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर बंदी लावली होती. ही बंदी गेल्यावर्षी उठवण्यात आली आहे. 

श्रीसंतला सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि केरळसाठी खेळण्याची परवानगी देखील मिळाली होती. श्रीसंत सध्या बॉलिवूडमध्ये येण्यासाठी तयारी करत आहे. पट्टा नावाचा सिनेमासोबत त्याने कॉन्ट्रॉक्ट केलं असून त्यामध्ये लीड रोलमध्ये श्रीसंत दिसणार आहे. 

या सिनेमामध्ये श्रीसंत सीबीआय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरेल अशी सर्वांनाच आशा आहे. श्रीसंतने मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी केली. मात्र आयपीएलच्या लिलावात त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. श्रीसंत पुन्हा आयपीएल कधी खेळणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे.