आधीच पाकिस्तानकडून मिळालेला पराभव; त्यातच हा खेळाडू दुखापतीमुळे पोहोचला रूग्णालयात

हा खेळाडू टीम इंडियाची चिंता वाढवण्याची शक्यता

Updated: Oct 25, 2021, 09:49 AM IST
आधीच पाकिस्तानकडून मिळालेला पराभव; त्यातच हा खेळाडू दुखापतीमुळे पोहोचला रूग्णालयात

मुंबई : T-20 वर्ल्डकप 2021मध्ये भारताला पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. वर्ल्डकपच्या इतिहासात पाकिस्तानच्या हातून भारत प्रथमच हरला आहे. तर या सामन्यानंतर हार्दिक पांड्यानेही विराट कोहलीची चिंता वाढवली आहे. पांड्याच्या रूपाने भारताला मोठा धक्का बसू शकतो.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर पंड्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. पंड्या दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरला नाही आणि इशान किशन पंड्याच्या त्याच्या जागी उतरला. पांड्याची दुखापत किती आहे हे अजून निश्चित होऊ शकलेलं नाही. पण येणारा धोका लक्षात घेता त्याला खबरदारी म्हणून स्कॅनसाठी पाठवण्यात आलं आहे.

हार्दिक पांड्याला उजव्या खांद्याला दुखापत

हार्दिक पांड्याला फलंदाजी करताना उजव्या खांद्याला दुखापत झाल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे. तो स्कॅनसाठी गेला आहे. पंड्याने पाकिस्तानविरुद्ध 11 धावांची खेळी खेळली. भारताला आता पुढील सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. अशा स्थितीत पांड्याच्या दुखापतीमुळे भारताचा नवा पेचप्रसंग उभा आहे. तर बराच काळ गोलंदाजी करू शकला नसल्याने पंड्याच्या फिटनेसबद्दल टीम इंडिया आधीच चिंतेत होती.

पांड्या पाठदुखीने त्रस्त होता

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला फलंदाज म्हणूनही संघात स्थान देण्यात आलं होतं. पंड्याचा पाकिस्तानविरुद्धचा सामना अतिशय खास होता. टॉसनंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना पांड्याने सांगितले की, तो पाठदुखीने त्रस्त होता, पण आता परिस्थिती ठीक आहे. 

गोलंदाजीसंदर्भात त्याच्या आणि टीम मॅनेजमेंटमध्ये चर्चाही झाली. त्याचवेळी विराट कोहलीने सांगितलं होतं की, हार्दिक पांड्याचा वर्ल्डकपसाठी गोलंदाज म्हणून वापर केला जाईल. पंड्या अशा पातळीवर आहे जिथे तो स्पर्धेच्या कोणत्याही टप्प्यावर काही ओव्हर्स टाकू शकतो. पांड्याला फलंदाज म्हणून त्याला नेहमी समर्थन दिलं आहे आणि तो संघासाठी खूप महत्त्वाचा आहे.