IND vs PAK | 'हिंदुस्तानी मुसलमानांच्या भावना सोबत होत्या'; पहिल्यांदा मिळालेल्या विजयाने पाकिस्तानी गृहमंत्र्याचे बेताल वक्तव्य

टी 20 विश्वकप क्रिकेट सामन्यात पहिल्यांदा भारताविरूद्ध पाकिस्तानला मिळालेल्या विजयामुळे पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचे बेताल वक्तव्य समोर आले आहे. 

Updated: Oct 25, 2021, 09:46 AM IST
IND vs PAK | 'हिंदुस्तानी मुसलमानांच्या भावना सोबत होत्या'; पहिल्यांदा मिळालेल्या विजयाने पाकिस्तानी गृहमंत्र्याचे बेताल वक्तव्य

 मुंबई : टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 12 राऊंड सामन्यामध्ये पाकिस्तानने टीम इंडियाला 10 विकेटने पराभूत करून मोठा विजय संपादन केला. आतपर्यंत क्रिकेट कप टुर्नामेंटमध्ये पाकिस्तानी टीम भारताकडून पराभूत होत आली आहे. 

दरम्यान, विश्वकपमध्ये मिळालेल्या विजयामुळे पाकिस्तानी गृहमंत्री शेख रशीद यांनी बेताल वक्तव्य केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर व्हिडिओ जारी करून म्हटले की, भारतातील मुसलमानांच्या भावनासुद्धा पाकिस्तानी टीमसोबत होत्या.

व्हिडिओमध्ये काय म्हटले पाकिस्तानी गृहमंत्र्यांनी?
टीम इंडियाविरूद्ध पहिल्यांदा विश्वकपमध्ये विजय मिळवल्यानंतर अति आनंद झालेल्या पाकिस्तानी गृहमंत्री रशीद यांनी आपल्या क्रिकेट टीमला शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानच्या जनतेला शुभेच्छा देतो. ज्याप्रकारे भारतीय टीमला पराभूत केले आहे त्याला सलाम करतो. तमाम जनतेला हा विजय साजरा करू द्यावा. आजच आमचा अंतिम सामना होता असं आम्ही समजतो. हिंदुस्तानसह जगभरातील मुसलमानांच्या भावना पाकिस्तानी टीम सोबत होत्या. सर्व इस्लामला या विजयाच्या शुभेच्छा.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्यात भारताचा पराभव झाला आहे. T20 World cup च्या भारताच्या पहिल्याच सामन्यात मोठं अपयश आलं आहे. टीम इंडियाच्या बोलर्सना पहिल्या 10 ओव्हर्समध्ये एकही विकेट घेण्यात यश मिळालं नाही. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली.

शाहिन आफ्रिदीने 3 विकेट्ल घेतल्या आहेत. त्यांची फिल्डिंगही मजबूत होती. रिझवान आणि बाबर आझमच्या सलामी जोडीनं आपल्या झंझावाती फलंदाजीनं मैदानात तुफान आणलं. दोघांच्या भागीदारीमध्ये 100 धावांचा पल्ला गाठला. बाबर आझमने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.