Suryakumar Yadav: येत्या 22 तारखेपासून इंडियन प्रिमीयर लीगला सुरुवात होणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सची टीम हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. यावेळी मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या टीमला एक मोठा धक्का बसला आहे. सूर्यकुमार यादवच्या रूपाने टीमला हा पहिला धक्का बसणार आहे.
टीम इंडियाचा आणि मुंबईच्या टीमचा स्टार फलंदाज सूर्यकुमार गेल्या काही दिवसांपासून दुखापत ग्रस्त असल्याची माहिती आहे. अशातच आता सूर्याला आयपीएलचे काही सामने मुकावे लागणार होते. मात्र आता तो आयपीएलचा संपूर्ण सिझन बाहेर जाण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या मिडीया रिपोर्टनुसार, आज म्हणजेच मंगळवारी सूर्याची फिटनेस टेस्ट होती. या टेस्टनंतर नॅशनल क्रिकेट अकादमीने खेळण्यासाठी आतापर्यंत मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे सूर्यकुमार आयपीलएमधील पहिल्या टप्प्याच्या सामन्यांना मुकणार आहे.
माहितीनुसार, सूर्यकुमार यादवची पुढील फिटनेस चाचणी काही दिवसांनी होणार आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी एक दिवस आधी त्याची फिटनेस टेस्ट होणार आहे. त्यानंतर सूर्याला पुढचा सामना खेळता येईल की नाही, हे ठरवले जाईल. या सगळ्यात सूर्यकुमारने सोशल मीडिया पोस्ट शेअर करून या बातमीला दुजोरा दिलाय. सूर्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ब्रोकन हार्टचा शेअर केला आहे. कदाचित सूर्याने मेसेज दिलाय की, तो फिटनेस चाचणीत नापास झाल्यामुळे निराश झालाय. कदाचित तो काही आयपीएल सामन्यांपासून दूर राहू शकतो.
Suryakumar Yadav's Instagram story. pic.twitter.com/2M7ZGBhTDN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 19, 2024