शुक्रवारपासून रंगणार WPL 2024 चा थरार; पाहा कसं आहे शेड्यूल, सामन्यांची वेळ! जाणून घ्या एका क्लिकवर

WPL 2024 Details: महिला प्रिमीयर लीगचा (डब्ल्यूपीएल) ताफा या वर्षी बंगळुरू आणि दिल्ली येणार आहे. मागच्यावर्षी प्रमाणे यावर्षी पण डब्ल्यूपीएलमध्ये एकूण 22 मॅचेस खेळले जाणार आहेत.

Updated: Feb 22, 2024, 02:50 PM IST
शुक्रवारपासून रंगणार WPL 2024 चा थरार; पाहा कसं आहे शेड्यूल, सामन्यांची वेळ! जाणून घ्या एका क्लिकवर title=

WPL 2024 Details: महिला प्रिमीयर लीग (डब्ल्यूपीएल) 2024 चा थरार येत्या शुक्रवारपासून सूरू होणार आहे. या डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सिजनमध्ये एकुण 22 मॅचेस खेळले जातील, तर पहिली मॅच  गतविजेत्या मुंबई विरूद्ध दिल्ली (Mumbai vs Delhi) यांच्यात होणार आहे.

महिला प्रिमीयर लीगचा (डब्ल्यूपीएल) ताफा या वर्षी बंगळुरू आणि दिल्ली येणार आहे. मागच्यावर्षी प्रमाणे यावर्षी पण डब्ल्यूपीएलमध्ये एकूण 22 मॅचेस खेळले जाणार, यामधून 11 मॅचेस या बंगळूरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये तर राहिलेल्या मॅचेस दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. टूर्नामेंटची पहिली लढत ही हरमनप्रीत कौरची मुंबई इंडियन्स आणि मेग लॅनिंगची दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार. टूर्नामेंटची अंतिम लढत ही 17 मार्चला दिल्लीमध्ये होणार आहे.

काय असणार सामन्यांची वेळ?

मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू, यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स या पाचही संघात रंगणार डब्ल्यूपीएलचे रणांगण. डब्ल्यूपीएलच्या या सीजनमध्ये कोणत्याही डबल हेडर मॅचेस असणार नाही. साऱ्या मॅचेस ह्या संध्याकाळी 7:30 पासून चालू होतील.

कोठे बघू शकतात WPL 2024?

तुम्ही  WPL 2024 च्या साऱ्या मॅचेसचा मजा डिजीटल प्लॅटफॅार्म जियो सिनेमावर बघू शकतात. जियो सिनेमावर लाईव्ह स्ट्रिमिंग बिलकुल फ्री आहे. टिव्हीवर डब्ल्यूपीएलचा मजा लुटण्यासाठी तुम्ही स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर पण बघू शकतात.

WPL 2024 स्क्वॉड

मुंबई इंडियन्सचा संघ - अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, हुमैरा काझी, इस्सी वोंग, जिंतीमनी कलिता, नॅट सीव्हर-ब्रंट, पूजा वस्त्राकर, प्रियांका बाला, सायका इशाक, यास्तिका भाटिया, शबनीम इस्माईल, फातिमा जाफर, कीर्तना बालकृष्णन.

दिल्ली कॅपिटल्स- ॲलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, मारिझाना कॅप, मेग लॅनिंग (कर्णधार), मिन्नू मणी, पूनम यादव, राधा यादव, शेफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया, तितास साधू, ॲनाबेल सदरलँड, अश्वनीकुमारी.

गुजरात जायंट्स - लौरा वोल्वार्ड्ट, फोबे लिचफील्ड, प्रिया मिश्रा, तृषा पूजिता, एशले गार्डनर, दयालन हेमलता, हरलीन देयोल, वेदा कृष्णमूर्ति, कैथरीन ब्राइस, स्नेह राणा, सयाली सतघारे, तनुजा कंवर, तरन्नुम पठान, बेथ मूनी(कर्णधार), लिया ताहुहू, मन्नत कश्यप, मेघना सिंह, शबनम शकील, सयाली सथगरे.

रॉयल चैलेंजर्स बंगळूरू - दिशा कसाट, शबनीम इस्माइल, स्मृति मंधाना(कर्णधार), आशा शोभना, एलिसे पेरी, जॉर्जिया वेयरहैम, कनिका आहूजा, नदाने डी क्लर्क, श्रेयंका पाटिल, सोफी डिवाइन, शबनम सतीश, इंद्राणी रॉय, ऋचा घोष, रेणुका सिंह, एकता बिष्ट, केट क्रॉस, रेणुका सिंह, केट क्रॉस, सिमरन बहादुर, सोफी मोलिनेक्स.

यूपी वॉरियर्स - किरण नवगिरे, डैनी व्याट, श्वेता सहरावत, वृंदा दिनेश, चमारी अटापट्टू, दीप्ति शर्मा, ग्रेस हैरिस, पारशवी चोपड़ा, पूनम खेमनार, एस यशश्री, सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मैकग्राथ, एलिसा हीली(कर्णधार), लक्ष्मी यादव, अंजलि सरवानी, राजेश्वरी गायकवाड़, गौहर सुल्ताना, साइमा ठाकोर.

WPL 2024 वेळापत्रक

  • 23 फेब्रुवारी - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • 24 फेब्रुवारी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध यूपी वॉरियर्स
  • 25 फेब्रुवारी - गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • 26 फेब्रुवारी - यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • 27 फेब्रुवारी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स
  • 28 फेब्रुवारी - मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स
  • 29 फेब्रुवारी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • 1 मार्च - यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स
  • 2 मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • 3 मार्च - गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • 4 मार्च - यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
  • 5 मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • 6 मार्च - गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
  • 7 मार्च - यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • 8 मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स
  • 9 मार्च - मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स
  • 10 मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
  • 11 मार्च - गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स
  • 12 मार्च - मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
  • 13 मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स
  • 15 मार्च - एलिमिनेटर मॅच
  • 17 मार्च - अंतिम सामना.