पाकिस्तानची महिला क्रिकेटर कोहलीवर फिदा

ही महिला क्रिकेटपटू कोहलीच्या फलंदाजीची चांगलीच फॅन आहे. सईदा नैन आबिदी असे या या महिला क्रिकेटपटूनचे नाव असून, ती पाकिस्तानी क्रिकेट टीमची सदस्याही असल्याचे समजते. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 18, 2018, 01:00 PM IST
पाकिस्तानची महिला क्रिकेटर कोहलीवर फिदा title=

नवी दिल्ली : दक्षिण अफ्रिकेविरूद्ध झालेल्या सहाव्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावत विराट कोहलीने द्विपक्षीय मालिकेत सर्वाधीक धावा केल्या. कोहलीच्या या खेळीचे पाकिस्तानच्या एका महिला क्रिकेटपटूने जोरदार स्वागत केले आहे. ही महिला क्रिकेटपटू कोहलीच्या फलंदाजीची चांगलीच फॅन आहे. सईदा नैन आबिदी असे या या महिला क्रिकेटपटूनचे नाव असून, ती पाकिस्तानी क्रिकेट टीमची सदस्याही असल्याचे समजते.

कोहली आहे खूपच जीनियस - सईदा

आपल्या खास अंदाजात सईदाने ट्विट करत तीने कोहलीचे कौतूक केले आहे. विराट कोहलीने ३५ शतक झळकावले असा उल्लेख करत तो अत्यंत जीनीअस असल्याचे तिने म्हटले आहे. तिने भारतीय कर्णधार म्हणून विराटने दाखवलेल्या एकाग्रतेचेही कौतूक केले आहे.

आणखी एक क्रिकेटर कोहलीवर फिदा

दरम्यान, पाकिस्तानची आणखी एक महिला क्रिकेटर कायनात इम्तियाजनेही कोहलीने मालिकेत केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे.