आयपीएल 2018 मध्ये या 3 खेळाडूंची झाली घरवापसी

आयपीएल 2018 साठी लिलाव पूर्ण झाला आहे. भारताचा जयदेव उनादकटने सर्वांनाच हैराण करुन टाकलं आहे. आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये तो सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 31, 2018, 04:48 PM IST
आयपीएल 2018 मध्ये या 3 खेळाडूंची झाली घरवापसी title=

मुंबई : आयपीएल 2018 साठी लिलाव पूर्ण झाला आहे. भारताचा जयदेव उनादकटने सर्वांनाच हैराण करुन टाकलं आहे. आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये तो सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे.

यंदाच्या सीजनमध्ये असे देखील खेळाडू आहेत. जे पुन्हा आपल्या जुन्या संघात आले आहेत. 

कोण आहेत ते 3 खेळाडू

1. युवराज सिंह

युवराज सिंग या यादीत सर्वात वर आहे. या वर्षीच्या आयपीएल लिलावात युवराज सिंगला पंजाबच्या टीमने खरेदी केलं आहे. आयपीएलच्या पहिल्या 3 सीजनमध्ये तो किंग्स इलेवन पंजाबकडूनच खेळला होता. त्यानंतर तो वेगवेगळ्या संघामध्ये खेळला.

2. गौतम गंभीर 

गौतम गंभीर आयपीएलमध्ये दिल्ली डेयरडेविल्सकडून आता खेळणार आहे. 2011 मध्ये खराब कामगिरीमुळे त्याला दिल्ली संघातून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर तो कोलकातामधून खेळत होता. कोलकात्याला त्याने 2 वेळा चॅम्पियन केलं. 2018 मध्ये आता तो पुन्हा दिल्ली संघात खेळणार आहे.

3. मुरली विजय

मुरली विजयला आयपीएल 2009 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने विकत घेतलं होतं. 2014 मध्ये मात्र त्याला दिल्लीने त्यांच्या टीममध्ये घेतलं. खराब कामगिरीमुळे त्याला चेन्नई संघात स्थान नव्हतं मिळालं. 2015 मध्ये पंजाबमधून तो खेळला. या वर्षी त्याला पुन्हा चेन्नईने संघात घेतलं आहे.