टीम इंडियात या 3 नव्या खेळाडूंची होणार एन्ट्री

कोण घेणार विराट, धोनी आणि रोहित शर्माची जागा

शैलेश मुसळे | Updated: May 5, 2018, 02:17 PM IST
टीम इंडियात या 3 नव्या खेळाडूंची होणार एन्ट्री title=

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये अनेक नव्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. अनेक नव्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करत भारतीय संघात आपली जागा निश्चित केली आहे. आगामी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्य़े भारतीय संघात 3 खेळाडूंना संधी मिळू शकते. भविष्यात हे 3 खेळाडू धोनी, विराट आणि रोहित शर्माची जागा घेऊ शकतात. जाणून घ्या कोण आहेत ते 3 नवे खेळाडू

1. पृथ्वी शॉ : भारतामध्ये सध्या प्रसिद्ध झालेल्या पृथ्वी शॉने भारतला अंडर-19 वर्ल्ड कप मिळवून दिला. पृथ्वी शॉने आपल्या चांगल्या कामगिरीमुळे आयपीएलमध्ये देखील जागा मिळवली. अनेकांकडून आज त्याच्या कामगिरीचं कौतूक होतंय. आतापर्यंत पृथ्वी शॉने 4 आयपीएल सामन्यांमध्ये 140 रन केले आहेत.

2. ऋषभ पंत : ऋषभ पंत हा नवा चेहरा देखील भारतीय संघात लवकरच जागा मिळवू शकतो. त्यांने त्याच्या बॅटींगने आतापर्यंत अनेकांना प्रभावित केलं आहे. ऋषभ पंत आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळत आहे. त्याने आतापर्यंत 9 सामन्यांमध्ये 375 रन केले आहे.

3. इशान किशन : इशान किशन हा विकेटकीपर आहे. पण त्याने त्या सोबतच्या उत्तम बॅटींग करत अनेकांकडून कौतूकाची थाप मिळवली आहे. इशान किशन यंदा आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळतोय. 8 सामन्यांमध्ये त्याने 151 रन केले आहे. इशान किशन भविष्यात महेंद्र सिंह धोनीची जागा घेऊ शकतो.