मुंबई : आयपीएलमध्ये सिक्स, फोर आणि विकेट पडल्यानंतर मैदानात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी चियर लीडर्स असतात. आयपीएलमध्ये चियर लीडर्सवरुन देखील मोठा वाद झाला होता. पण एक क्रिकेटर असा आहे ज्याने एका चियर लीडरसोबत लग्न केलं आहे. विराटच्या बंगळुरु टीममध्ये खेळणाऱ्या एका क्रिकेटरची प्रेम कहानी काही वेगळी आहे. एका सामन्या दरम्यान या खेळाडुची भेट या चिअर लीडरसोबत झाली होती. डिकॉक बॅटींग करत असतांना त्याची नजर या चीअर लीडरवर पडली होती. त्यानंतर त्याने तिच्या सोबत लग्न केलं.
बंगळुरुसाठी ओपनिंग करणारा आणि दक्षिण आफ्रिकेसाठी विकेट किपिंग करणारा डि कॉकची लव्ह स्टोरी बद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. डि कॉकच्या पत्नीचं नाव साशा हर्ले आहे. जी खूप सुंदर चीयर लीडर आहे. मॅच संपल्यानंतर लगेचच क्विंटन डि कॉक पळत साशाकडे गेला आणि तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या. त्यानंतर हळूहळू तो तिला डेट करु लागला. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
— Sasha De Kock (@SashaDeKock) May 1, 2017
Day off means exploring pic.twitter.com/sEx16nnAyL
— Sasha De Kock (@SashaDeKock) November 16, 2016
Congratulations @QuinnyDeKock69 & @SashaHurly who got married today! May you always find joy in one another. pic.twitter.com/xR2quN3uLi
— Cricket South Africa (@OfficialCSA) September 19, 2016