या खेळाडूचं टेस्ट टीममधील स्थान धोक्यात!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी या खेळाडूची खराब कामगिरी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. 

Updated: Nov 25, 2021, 03:17 PM IST
या खेळाडूचं टेस्ट टीममधील स्थान धोक्यात! title=

कानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराची खराब कामगिरी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा 88 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत पुजाराकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण त्याला मोठी खेळी खेळता आली नाही.

या फलंदाजाची फलंदाजी खूपच निराशाजनक

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराची फलंदाजीची पद्धत खूपच निराशाजनक दिसली. एकीकडे शुबमन गिलसारखा युवा उत्तम खेळत होता, तर पुजाराची फलंदाजी फारशी चांगली होताना दिसली नाही. शुभमन गिल (52) बाद झाल्यानंतर काही वेळातच पुजाराने 26 धावांवर टीम साऊथीचा बळी ठरला.

पुजाराची कारकीर्द संपणार!

चेतेश्वर पुजाराने 2019 पासून एकही शतक झळकावलेलं नाही. त्याला टीम इंडियामध्ये भरपूर संधी मिळाल्या आहेत आणि बीसीसीआयमध्ये खेळाडूंची कमतरता नाही. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पुजारा काही खास कामगिरी करू शकला नाही, तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. 

सूर्यकुमार यादव पुजाराची जागा घेणार?

चेतेश्वर पुजाराचा फ्लॉप शो असाच सुरू राहिला तर भारतीय टीम मॅनेजमेंट सूर्यकुमार यादवला त्याची जागा देऊ शकते. सूर्यकुमार यादव हा चेतेश्वर पुजारापेक्षा चांगला फलंदाज आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सूर्यकुमार यादव चेतेश्वर पुजारासाठी धोका ठरू शकतो.