मुंबई : आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना टीम इंडियात संधी दिली जाते. यंदाच्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. उमरान मलिक आणि कुलदीप सेनसोबत आता आणखी एका खेळाडूचं नाव चर्चेत आहे. ज्याला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळू शकते.
टिळक वर्माला टीम इंडियात फलंदाजीसाठी संधी दिली जाणार आहे. मुंबईकडून टिळक वर्मा सध्या खेळत आहे. टीमची कामगिरी निराशाजनक असली तरी तो उत्तम खेळताना दिसत आहे. 13 सामन्यांमध्ये त्याने 376 धावा केल्या.
टिळक वर्माला टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळू शकते असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे. टिळक वर्माकडे वेगवेगळे शॉर्ट्स खेळण्याचं कौशल्य आहे. त्याला कसं खेळायचं याची जाण आहे. त्यामुळे तो लवकरच टीम इंडियातून खेळताना दिसेल.
याआधी रोहित शर्मानेही टिळक वर्माला टिम इंडियातून खेळण्याची संधी मिळेल असे संकेत दिले होते. आता सुनील गावस्कर यांनी टिळक वर्माबाबत मोठं भाकीत केलं आहे.
टिळक वर्माने यंदाच्या हंगामात 33 व्या सामन्यात 43 बॉलमध्ये 51 धावांची खेळी केली आहे. यंदाच्या हंगामातला हा सर्वात हायस्कोअर एका मॅचमध्ये केला आहे. टिळक वर्माला 1.7 कोटी रुपये देऊन मुंबईने आपल्या टीममध्ये घेतलं. टीमची कामगिरी निराशाजनक असली तरी टिळक वर्मा डेब्यूमध्येच चांगली कामगिरी करत असल्याचं दिसत आहे.