विराट कोहलीचा अॅक्शन अवतार, चाहत्यांना मोठा धक्का

विराट आता काय करणार? 

विराट कोहलीचा अॅक्शन अवतार, चाहत्यांना मोठा धक्का

मुंबई : क्रिकेटर विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज. मैदानावर आपला विक्रम दाखवणारा विराट कोहली आता अॅक्शन अवतारात दिसणार आहे. विराट कोहली लवकरच एका फील्डमध्ये डेब्यू करणार आहे. त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. तुम्हाला वाटत असेल की विराट देखील अनुष्का शर्मा सारखा अभिनयात पदार्पण करत असेल तर थांबा ही बातमी संपूर्ण वाचा.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने Trailer the Movie करता आपला लूक ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो अॅक्शन अवतारात दिसणार आहे. विराट कोहलीचा हा लूक पाहण्यासारखा आहे. दोन्ही हात लांब करून चालत असलेल्या कोहलीच्या मागे कार एकमेकांना आपटत आहेत. 

पोस्टर शेअर करता विराट म्हणाला की, nother debut after 10 years, can't wait!  #TrailerTheMovie http://www.trailerthemovie.com या पोस्टरवर एक रिलीज डेट दिली आहे. आता हे Trailer The Movie काय आहे? 

हा डेब्यू कोणत्या सिनेमाचा नाही तर तर विराट कोहली आपल्या ब्रँड करता डेब्यू करत आहे. विराट wrogn.in च्या बॅनर अंतर्गत क्लोथिंग ब्रँडची सुरूवात करत आहे. wrogn विराट कोहलीच्या वॉर्डरोलमधून इंस्पायर्ड क्लोथ विकतो. आता विराट trailerthemovie.com मधून आऊटफिट्स विकणार आहे. या वेबसाइटचं लाँचिंग 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.