पृथ्वी शॉने तोडला कॅप्टन कोहलीचा हा रेकॉर्ड

पृथ्वी शॉने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडला आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 3, 2018, 06:14 PM IST
 पृथ्वी शॉने तोडला कॅप्टन कोहलीचा हा रेकॉर्ड  title=

माऊंट माऊंगानुई : मुंबईकर पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली अंडर १९ टीम इंडियाचा संघ जगज्जेता झाला.

सुरूवातीच्या सामन्यांपासूनच टीम इंडियाची पकड मजबूत असल्याचे पाहायला मिळत होते. प्रत्येक मॅच दरम्यान खेळाडूंचे नवनवीन रेकॉर्ड पाहायला मिळाले. 

१४ धावांची होती गरज

पृथ्वी शॉने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडला आहे.  त्यामूळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्याआधी पृथ्वी शॉ ला १४ धावांची गरज होती. त्यामूळे विश्वचषक जिंकण्यासोबतच त्याच्या फॅन्सचे लक्ष पृथ्वी शॉ च्या रेकॉर्डकडे होते.

काय आहे रेकॉर्ड ? 

पृथ्वी शॉने अंडर १९ वर्ल्ड कपमधील ६ सामन्यात १६१ धावा केल्या. यामध्ये त्याने २ हाफ सेंच्युरी केल्या. विराट कोहली आणि उन्मुक्त चंद यांनी हा रेकॉर्ड याआधी केला होता.

६ सामन्यात रेकॉर्ड 

विराट कोहलीने २००८ साली अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये २३५ धावा केल्या. तर उन्मुक्त चंद याने हा रेकॉर्ड मोडत २०१२ मध्ये २४६ धावा केल्या. ६ सामन्यांमध्ये या दोघांनीही हा स्कोअर उभा केला होता. 
 
 या दोघांच्याही नेतृत्वात टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता हे विशेष म्हणावे लागेल.