भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली क्रिकेटपटू उमर अकमल निलंबित

 चौकशीपर्यंत उमर अकमलला एकाही क्रिकेट स्पर्धेत खेळता येणार नाही 

Updated: Feb 20, 2020, 01:41 PM IST
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली क्रिकेटपटू उमर अकमल निलंबित title=

नवी दिल्ली | पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमलला निलंबित करण्यात आलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं अकमलवर कारवाई केली आहे. उमर अकमलवर भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत उमर अकमलला एकाही क्रिकेट स्पर्धेत खेळता येणार नाही असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सांगितलं आहे. अकमल काही तासांनी मैदानावर उतरण्याआधीच त्याला हा दणका बसला आहे. सध्या पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) 2020 सुरु आहे. त्याला आता यामध्ये खेळता नाही येणारे. 

गुरुवारी पाक क्रिकेट बोर्डाने या बाबत पत्रक जारी करत म्हटलं की, "पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज पीसीबी अँटी-करप्शन कोडच्या अनुच्छेद 4.7.1 नुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकणाची चौकशी सुरु असल्याने यावर बोर्डाने बोलण्यास नकार दिला आहे. पाकिस्तान सुपर लीग 2020 मध्ये आता उमर अकमलच्या रिप्लेसमेंटसाठी क्वेटा ग्लेडिएटर्सला अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

याआधी ही अकमलवर बंदी लावण्यात येणार होती. त्याच्यावर आरोप होता की, त्याने फिटनेस टेस्ट दरम्यान गैरवर्तवणूक केली होती. त्याने रागात कपडे काढले होते. पण यावेळी त्याच्यावर कारवाई झाली नव्हती.