टीम इंडियाचा उत्कृष्ट गोलंदाज Umesh Yadavकडून आपल्या कामगिरीबद्दल मोठी घोषणा

भारतीय टीमचा वेगवान आणि उत्कृष्ट गोलंदाज उमेश यादवने आपल्या कामगिरीबद्दल एक मोठी घोषणा केली आहे.

Updated: Apr 3, 2021, 10:08 PM IST
टीम इंडियाचा उत्कृष्ट गोलंदाज Umesh Yadavकडून आपल्या कामगिरीबद्दल मोठी घोषणा  title=

मुंबई : भारतीय टीमचा वेगवान आणि उत्कृष्ट गोलंदाज उमेश यादवने आपल्या कामगिरीबद्दल एक मोठी घोषणा केली आहे. उमेशने आपण आणखी किती वर्ष क्रिकेट खेळू शकतो आणि कधीपर्यंतर त्याचा निवृत्तीचा विचार आहे या बद्दल खुलासा केला आहे. आणखी दोन ते तीन वर्षे तो क्रिकेट खेळू शकतो आणि  जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये सामनावीर होण्याची त्याची इच्छा असल्याचे उमेशने सांगितले.

अनेक वर्षांपासून भारताचा एक उत्कृष्ट गोलंदाज

गेली तीन वर्षे उत्तम कामगिरी करूनही उमेश यादवला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणे कठीण जात आहे. इतकेच नाही तर मोहम्मद सिराज भारतीय संघात आल्याने उमेशच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. उमेशने आपल्या कामगिरीत आत्तापर्यंत 48 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह तो भारताच्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांच्या यादीत येतो. पण आता उमेशची कारकीर्द संपुष्टात आली आहे.

उमेश आणखी २ वर्ष खेळणार

उमेश यादवने ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना सांगितले की, "मी आता 33 वर्षांचा आहे आणि मला माहित आहे की, मी माझ्या शरीराला खेळासाठी जास्तीत जास्त पुढील दोन किंवा तीन वर्षांसाठी  फिट ठेवू शकतो. याशिवाय काही तरुण खेळाडूही येत आहेत. हे चांगले आहे कारण शेवटी त्याचा फायदा केवळ संघालाच होतो." पुढेतो म्हणाला, " तुमच्याकडे चार किंवा पाच टेस्ट सामन्यांसाठी पाच किंवा सहा वेगवान गोलंदाज असतात, तेव्हा दबाव आणि काम कमी करण्यासाठी तुम्ही त्यापैकी प्रत्येकाला दोन सामन्यांमध्ये खेळऊ शकता. यामुळे गोलंदाजांना बर्‍याच काळ टिकवून ठेवण्यास मदत होईल."

"दुखापतीमुळे मला जास्त त्रास झाला नाही, याबद्दल देवाचे आभार मानतो. वेगवान गोलंदाज म्हणून हे चांगले आहे. कारण एकदा वेगवान गोलंदाज जखमी होऊ लागला की, तो अडचणीत सापडतो आणि यामुळे त्याचे करिअर धोक्यात येते."

टेस्ट  चैंपियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळायला उत्सूक

ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिज दरम्यान उमेश यादव जखमी झाला होता. पण इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत शेवटच्या दोन कसोटी सामन्यात तो परतला. परंतु,  11 खेळाडूमध्ये त्याला जागा मिळाली नाही. उमेश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात हातभार लावण्यास उत्सूक आहे.

तो म्हणाला, 'आम्ही येथे पोहोचण्यासाठी खरोखर कठोर परिश्रम घेतले आणि मर्यादित ओव्हरमध्ये नियमितपणे न खेळणाऱ्या माझ्यासारख्या खेळाडूसाठी चांगले आहे. जर मी त्या सामन्यात चांगली कामगिरी केली आणि आम्ही जिंकलो तर वर्ल्ड चॅम्पियन बनणे माझ्यासाठी कायमचे अविस्मरणीय गोष्ट राहील.