विराट कोहलीने आपल्या कारकीर्दीत या बॉलरला टाळलं....म्हणून करियर धोक्यात

विराट कोहलीने टीम इंडियामध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, शार्दुल ठाकूर सारख्या अनेक नव्या खेळाडूंना संधी देऊन त्यांचं करियर सेट केलं.

Updated: Sep 16, 2021, 09:28 PM IST
विराट कोहलीने आपल्या कारकीर्दीत या बॉलरला टाळलं....म्हणून करियर धोक्यात

मुंबई: एका कर्णधारानं करियर घडवलं तर दुसऱ्यानं टाळलं म्हणून करियर धोक्यात आलं अशी अवस्था टीम इंडियातील एक क्रिकेटपटूची झाली आहे. एका मुलाखतीमध्ये देखील या क्रिकेटपटूनं यासंदर्भात खुलासा केला होता. टीम इंडियाच्या कर्णधारपदाचं नेतृत्व विराट कोहलीच्या हाती आल्यानंतर या खेळाडूला संघात स्थान सहसा मिळालंच नाही. बऱ्याचदा टाळलं गेलं. त्यामुळे त्याचं करियर धोक्यात आलं आहे. 

विराट कोहलीने टीम इंडियामध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, शार्दुल ठाकूर सारख्या अनेक नव्या खेळाडूंना संधी देऊन त्यांचं करियर सेट केलं. पण त्याच बरोबर उमेश यादवला सतत टाळलं गेल्यानं त्याच्या करियरवर गदा आल्याची चर्चा आहे. एका मुलाखती दरम्यान उमेश यादवनेही सांगितलं होतं. 

एका मुलाखती दरम्यान उमेश यादवने सांगितलं की महेंद्रसिंह धोनीमुळे माझं करियर खऱ्या अर्थानं घडलं. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझ्या बॉलिंगमध्ये काही सुधारणा असतील तर त्या सांगितल्या. त्यांचा खूप सपोर्ट मिळाला. मात्र आता तसं होत नाही. अशी खंतही त्याने व्यक्त केली होती. 

उमेश यादवसोबत हळूहळू एकदिवसीय आणि टी -20 संघातून पूर्णपणे काढल्यात जमा झाल्यासारखं झालं. आता उमेश यादवला भारतीय कसोटी संघात खेळण्याची संधी खूप क्वचितच मिळते. इंग्लंड दौऱ्यावरही उमेश यादवची कामगिरी विशेष चांगली राहिली नाही. त्यामुळे आता कसोटी कारकीर्दही धोक्यात असल्याची चर्चा आहे. 

विराट कोहलीने नुकतीच आपल्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. टी 20 वर्ल्डकप नंतर कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याचं ट्वीट करत विराटने सांगितलं. आता पुढचा कर्णधार कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. नवा कर्णधार पुन्हा उमेश यादवला पुन्हा संघात संधी देणार हे पाहावं लागणार आहे.