मुंबई : टीम इंडियाचा (Indian Cricket Team) नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टी 20 वर्ल्ड कपनंतर कर्णधारपदावरुन पायऊतार होणार आहे. विराटने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. विराट टी 20 क्रिकेटमधील कॅप्टन्सी (Team India Captain) सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र विराटने घोषणा केल्यानंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.विराटनंतर टी 20 क्रिकेटच्या नेतृत्वाची धुरा ही रोहित शर्माला (Rohit Sharma) मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे.
यानिमित्ताने टीम इंडियाचा पुन्हा एकदा बेस्ट कोण, अशी चर्चा पुन्हा क्रीडा वर्तुळात सुरु झाली आहे. राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली पैकी बेस्ट कॅप्टन कोण, असा प्रश्न टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला विचारण्यात आला. (team india former batsman suresh raina given reaction on who best captain about rahul dravid mahendra singh dhoni and virat kohli)
रैनाने राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या तिघांच्या कर्णधारपदाची तुलना केली आहे. भारताने या तिन्ही कर्णधारांच्या नेतृत्वात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. द्रविडने त्याच्या कॅप्टन्सीत इंग्लंडचा त्यांच्याच घरात 2007 मध्ये कसोटी मालिकेत पराभूत केलं होतं. तर धोनी कर्णधार असताना त्याने टी 20 वर्ल्ड कप, एकदिवसीय वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकून दिली होती.
बेस्ट कॅप्टन कोण?
विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने देशासह-परदेशासह उल्लेखनीय कामगिरी केली. रैनाने या तिन्ही कर्णधारांच्या कामगिरीच्या आधारावर आपला आवडता कर्णधार निवडला.
रैना काय म्हणाला?
मी धोनीसोबत फलंदाज आणि खेळाडू म्हणून खूप क्रिकेट खेळलोय. मी जेव्हा टीममध्ये आलो तेव्हा संघ आकार घेत होता. तेव्हा मी राहुल द्रविडच्या अंडर खेळलो होतो. विराट आणि मी अनेकदा मोठ्या भागीदाऱ्या केल्या. अनेक रेकॉर्ड केले. त्यामुळे माझ्यासाठी बेस्ट कर्णधार म्हणून धोनी, द्रविड आणि कोहली आहे.
रैना आरजे शौनक शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळस त्याने हे उत्तर दिलं. धोनी आणि रैनाच्या क्रिकेट कारकिर्दीला जवळपास एकत्रच सुरुवात झाली. रैना टेस्ट, वनडे आणि टी 20 या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारा एकमेव भारतीय आहे.
रैनाने अशा प्रकारे आपला बेस्ट कॅप्टन कोण हे सांगितलं. रैनाने धोनीला द्रविड आणि कोहलीपेक्षा उत्कृष्ठ असल्याचं सांगितलं. रैनाने धोनीनंतर द्रविड आणि कोहलीला पंसती दिली आहे. रैना धोनीसोबत खूप क्रिकेट खेळला आहे.