दुबई: UAE मध्ये सगळ्या टीम सेमीफायनल आणि फायनलमध्ये जाण्यासाठी लढत आहेत. इंग्लंड आणि पाकिस्तान सेमीफायनलसाठी पोहोचले आहेत. मात्र मैदानात एक अंपायरकडून एक चूक झाली. त्या चुकीसाठी त्यांना चक्क ICC ने मोठी शिक्षा दिली आहे.
द डेली मिररने दिलेल्या रिपोर्टनुसार माजी फलंदाज आणि इंग्लंडचा सर्वोत्कृष्ट अंपायर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायकल गॉ यांच्यावर ICC ने बंदी घातली आहे. 6 दिवसांसाठी त्यांच्यावर बंदी लावण्यात आली आहे. गॉ बायो-बबलमध्ये असताना हॉटेलमधून एका व्यक्तीला भेटण्यासाठी बाहेर गेले होते. त्यांनी याची माहिती कोणालाही आधी कळवली नव्हती. ICC आणि बायोबबलच्या नियमाचं उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई कऱण्यात आली आहे.
मायकल यांनी बायो-बबलच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्यांना 6 दिवस बॅन करण्यात आलं आहे. त्यांना एक छोट्या चुकीची शिक्षा मिळाली आहे. बंदीनंतर इंग्लंडचे अंपायर मायकेल गॉ क्वारंटाईनमध्ये आहेत. T20 वर्ल्ड कपसाठी ICC ने खेळाडूंना बायो बबलमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मायकेल गॉ बायो बबलमधून बाहेर आलेय त्यांनी ICC च्या नियमांचं उल्लंघन केलं. ज्यामुळे त्यांना 6 दिवस अंपायरिंग करता येणार नाही. रविवारी दुबईत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात इंग्लंडचे अंपायर मायकेल गॉ हे अंपायर करणार होते.
गॉ यांच्या चुकीमुळे आता त्यांच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या माराइस इरास्मसने अंपायरिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गॉ यांची सलग 6 दिवस कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. ही चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच सहा दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण होईल. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच ते पुन्हा मैदानात अंपायर म्हणून उभे राहू शकतील असं सांगण्यात आलं आहे.