मुंबई : भारत-इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटीची चर्चा सगळीकडे सुरु आहे. या सामन्यात अवघ्या काही वेळातच होत्याचं नव्हतं झालं. रोहितच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाने हा सामना गमावला. दरम्यान, विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यातील विवाद या सामन्यात पहायला मिळला. यानंतर आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये अंपायरने इंग्लंडच्या खेळाडूला फटकारलंय.
हा खेळाडू दुसरा कोणी नसून इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड होता. ज्याला अंपायर रिचर्ड कॅटलब्रो यांनी फटकारलं होतं. पंच म्हणाले की, अंपायरिंग आम्हाला करू द्या आणि तुम्ही शांतपणे फलंदाजी करा, अन्यथा योग्य होणार नाही.
ही घटना इंग्लंडच्या पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉड फलंदाजीला आला तेव्हा घडली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी स्टुअर्ट ब्रॉडची फलंदाजी आली तेव्हा त्याला सतत बाऊन्सरचा फटका बसला. त्यावर त्याने अंपायरसमोर प्रश्न उपस्थित केले, त्यावर अंपायर भडकले.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रिचर्ड कॅटलब्रो म्हणतायत की, आम्हाला अंपायरिंग करू द्या आणि तुम्ही फलंदाजी करा. अन्यथा तुम्ही अडचणीत याल. ब्रॉड, बॅटींग कर आणि तुझं तोंड बंद करं. अंपायर रिचर्ड आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्यातील या संभाषणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
this has killed me pic.twitter.com/fOKgav8xUm
— Abi Slade (@abi_slade) July 4, 2022
अशाच पद्धतीची ही लढत विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात झाली. जॉनी बेअरस्टो फलंदाजी करत असताना विराट कोहली स्लिपमध्ये होता. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि विराट कोहलीने जॉनीला सांगितले की, तू तोंड बंद कर आणि शांतपणे बॅटींग कर.