Ind vs Eng 4th test : विराटने आता याबाबतीत केली धोनीची बरोबरी

Ind vs Eng 4th test : माहीच्या पावलावर विराटचं पाऊल, चौथ्या कसोटीत अनोखा विक्रम

Updated: Mar 4, 2021, 02:33 PM IST
Ind vs Eng 4th test : विराटने आता याबाबतीत केली धोनीची बरोबरी title=

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या मालिकेतील आज अखेरचा सामना होत आहे. या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा, आर अश्विन, अक्षर पटेल आणि ऋषभ पंत गेम चेंजर ठरू शकतात. त्यांनी दमदार कामगिरी केल्यास मालिका भारतीय संघाच्या ताब्यात येईल.

रोहित शर्मा, आर अश्विन वेगवेगळे रेकॉर्ड करत नोंदवत आहेतच पण आता आणखीन एका खास रेकॉर्डची चर्चा आहे. कर्णधार विराट कोहली माहीच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

भारताच्या सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपदाचा विक्रम आता धोनी तसेच विराटच्या नावावर झाला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेला भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना हा विराटच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीतला 60वा सामना आहे. कर्णधार म्हणून विराट हा 60 वा सामना खेळत आहे. याआधी महेंद्रसिंग धोनीनं भारताच्या 60 कसोटी सामन्यांचं नेतृत्त्व केलं आहे. 

'या' स्टार खेळाडूची तुफान फलंदाजी; 6 चेंडूवर 6 षटकार, पाहा VIDEO

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने 59 कसोटी सामन्यांपैकी 35 कसोटी सामने जिंकले आहेत  तर 14 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. याशिवाय 10 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. माहीच्या नेतृत्वात भारताने 60 कसोटी सामन्यांमध्ये 27 विजय मिळवला. 18 गमावले आणि 15 ड्रॉ झाले आहेत. भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून विराट कोहलीचे नाव यापूर्वीच नोंदविण्यात आले आहे. 

भारत विरुद्ध इंग्लंड सध्याच्या कसोटी मालिकेचा विचार करायचा तर भारतानं सध्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.  पहिल्या कसोटीत इंग्लंडने 227 धावांनी विजय मिळवला, तर दुसरी कसोटी सामना 317 धावांनी जिंकला. तिसऱ्या कसोटीवर भारतानं आपली पकड मजबूत केली. चौथ्या कसोटी सामन्यात नेमकं काय होणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.